India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चिमुकलीच्या या व्हिडिओची सोशल मीडियात खळबळ; असं काय आहे त्याच्यात? तुम्हीच बघा…

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वांच्याच घरात पती-पत्नीमध्ये लहान-मोठे तंटे होतच असतात. कधी वाद लवकर मिटतो तर कधी लांबतो. अशाच एका भांडणारदरम्यान बाबा आईला मारहाण करत असल्याचे सहन न झालेल्या मुलीने चक्क वडिलांच्याच कानाखाली आवाज काढल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भातील व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवून दिली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये चिमुकल्यांचे आगळेवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट होताना दिसताहेत. त्यामुळे कोण, कधी रातोरात सोशल मीडियावर स्टार बनेल याचा काही भरवसा राहिलेला नाही. कधीकधी तर या लहान मुलांचे व्हिडिओ पाहून त्यांच्या कृतीचे कौतुक करावे की चिंता, असादेखील प्रश्न पडतो. वडिलांच्या कानशिलात लगावणाऱ्या मुलीचा व्हिडिओदेखील तसाच आहे. आपले बाबा आईला मारहाण करत असल्याचा राग आल्यामुळे चिडलेल्या मुलीने वडिलांनाच थप्पड लगावली. तिच्या या कृतीमागील उद्देश चांगला असला तरी इतक्या लहान वयात मुलं वडिलांवर हात उचलतात, ही चिंतेची बाब असल्याची भावनादेखील व्यक्त करण्यात येत आहे.

नेमका असा आहे व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना समजावत आहे, तुम्ही मम्मीला मारू नका मी सांगतेय ना असंही ती बोलताना दिसते. पण मुलीला अजून चिडवण्यासाठी तिचे बाबा बाजूला बसलेल्या स्वतःच्या बायकोला गंमतीत एक फटका मारतात, खरंतर हा एकूण प्रकार गंमतीतच घडत असतो पण आईला मारल्याचं पाहून चिमुकली अशी भडकते की ती थेट बाबांच्याच कानाखाली मारते. एवढ्यावरच थांबत नाही तर ती पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये वडिलांना अक्षरश: झापून काढते.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

Small Girl Video Viral in Social Media


Previous Post

‘या’ रुग्णालयातील असुविधा पाहून एकनाथ शिंदे संतप्त; या दोघांच्या निलंबनाचे तडकाफडकी आदेश

Next Post

कपडे बदलतानाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने प्रथमच दिली ही प्रतिक्रीया

Next Post

कपडे बदलतानाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने प्रथमच दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group