सत्येंद्र जैन यांचाही राजीनामा
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अबकारी धोरण प्रकरणात घेरलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर अगोदर तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांनी राजीनामा दिला आहे. रविवारी आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. आपच्या या दोघांचा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्विकारला आहे. सिसोदिया यांच्याकडे १८ विभाग होते.
सिसोदिया यांच्यावर हे आहे आरोप
सिसोदिया आणि इतर लोकसेवकांवर मद्य परवानाधारकांना अनुचित फायदा देण्याच्या उद्देशाने सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ लागू केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या धोरणाला महसूल निर्मितीचे मॉडेल म्हटले जात होते तर भाजपने या धोरणावर कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. नवीन धोरण लागू झाल्यानंतर दिल्लीत लोकांना स्वस्तात दारू मिळत होती. पण त्यामुळे या धोरणाबाबत गदारोळ वाढत गेला आणि प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचले. नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत मुख्य सचिव नरेश कुमार यांना तपासात त्रुटी आढळल्या आहेत, ज्याच्या आधारे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नवीन उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात शुक्रवारी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अगोदर ३१ ठिकाणी छापे टाकले होते. यात अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती.