सिन्नर – सिन्नर नगर परिषदेच्यावतीने सिंगल युज प्लास्टिक बंदी मोहीम व नायलॉन मांजा बंदी मोहीम राबविण्यात आली. शहरातील दोन दुकानांमध्ये ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन सुमारे १५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांन्वये पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ अंतर्गत प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तुपासून बनविलेला नायलॉन मांजा पतंग उडविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कायमस्वरुपी बंदी घालण्यात आलेली आहे. या अनुषंगाने मोहीम मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र देशमुख, सतिश शिंदे, विजय वाजे, सचिन कापडणीस, संतोष जाधव, दीपक पगारे, अरफात अत्तार, ताहिर शेख, विलास रुपवते, राहुल बेंडकुळे आदींच्या पथकाने मोहीम राबवली. शहरातील आनंद अगरबत्ती, उदय जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये सिंगल युज प्लास्टिक आढळून आले. ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन त्यांकडून १५ हजाराचा दंड वसुल करण्यात आला.
नायलॉन मांजा विक्रीबाबत नोटीसा
शहरातील पतंग विक्रेते प्रकाश वसंत परदेशी, प्रमोद मोरे, गणेश शिंदे, रज्जाक सय्यद, जोगेश्वरी पतंग स्टॉल, आदीशक्ती स्टोअर्स, आश्विनी पेटकर, श्रद्धा सबुरी स्टोअर्स आदी दुकानदारांना नायलॉन मांजा विक्री, वाहतुक, साठवणुक व वापरात मनाईबाबत नोटीसा बजावण्यात आल्या.