सिन्नर – दिवंगत पी. एन. पनिकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयात वाचन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. ग्रंथालय विभागात वाचन दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात पणिकर यांच्या कार्याचे पैलू उलगडले,त्यात त्यांनी सुरू केलेली केरळ मधील ग्रंथालय चळवळ, तसेच केरळमधील साक्षरतेला चालना देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण बाबींची नोंद केली होती असे सांगितले, पुढे त्यांनी केलेल्या ग्रंथालय चळवळीमुळे केरळमधील नागरिकांना राज्यभरात ग्रंथालय स्थापन करून वाचन साहित्यापर्यंत सहज प्रवेश मिळविता आले, त्यांच्या परिश्रमामुळे केरळ राज्य साक्षरता अभियानाला मोठा पाठिंबा मिळाला, त्यांनी सुरू केलेले ग्रंथालय चळवळीचे काम सध्या केरळमधील पणीकर फाउंडेशन करीत आहे. आणि फाउंडेशनने सध्या वाचन मिशन २०२२ हे कार्य हाती घेतले आहे. त्यांनी सुरु केलेल्या ग्रंथालय चळवळीमुळेच त्यांना केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक असेही संबोधले गेले आहे.
पनिकर यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून १९ जून हा वाचन दिन केरळ सरकार १९९६ पासून साजरा करीत आहे असे प्राचार्य पी.व्ही.रसाळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. पुढे ग्रंथपाल डॉ.सुभाष अहिरे यांनी ग्रंथप्रदर्शन घेण्यामागची भूमिका सांगितली व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडून ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून मिळालेल्या १०० ग्रंथांची ग्रंथपेटी बद्दल उपस्थित प्राध्यापकांना माहिती दिली. मराठी विभाग प्रमुख डॉ.डी.एल.फलके यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय लिपिक सुधीर विधाते यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.एम. जाधव, डॉ.एस.एन. पगार, प्रा.बी.यु. पवार, प्रा. सी.जी. बर्वे, प्रा.जि.पी.चिने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयीन सेवक विलास चव्हाण, मयूर बाजारे, उत्तम चव्हाणके, केदारनाथ मवाळ, रामदास डावरे, अरविंद घोलप, संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले.