सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी हिचा आज शुभविवाह होत आहे. सिन्नर-शिर्डी रोडवरील एस जी पब्लिक स्कूलच्या पटांगणात आज गोरज मुहूर्तावर होत आहे. त्यानिमित्त विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
माजी आमदार प्रकाश वाजे यांची नात आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची कन्या चि सौ का मानसी हिचा विवाह चि. संकेत यांच्याशी होत आहे. संकेत हे भारतीय रेल्वे पोलिस दलात अधिकारी आहेत. संकेत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील लोणी येथील रहिवासी आहेत. अॅड. श्री. गोकुळराव जगन्नाथ धावणे यांचे ते सुपुत्र आहेत. अॅड धावणे हे वकील आहेत.
https://twitter.com/AUThackeray/status/1622831267594260481?s=20&t=UX8VOFku_i88dGhti3mtjQ
राजाभाऊ वाजे हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमधून आमदार झाले होते. वाजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा झडत होत्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, ते ठाकरे गटाबरोबरच असल्याचे सांगितले जाते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वाजे यांच्या घरी शुभकार्य असल्याने आदित्य ठाकरे यांनी काल रात्रीच सदिच्छा भेट देऊन वधूवरांना शुभाशिर्वाद दिले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही भावी दाम्पत्यास भेटून शुभेच्छा दिल्या व भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या. याप्रसंगी उदय सांगळे, राजेंद्र जगझाप, राजेंद्र भगत तसेच वाजे आणि धावणे कुटुंबातील सदस्य यावेळेस उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे हे सुद्धा आज सायंकाळी विवाह समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/RajabhauW/status/1621526354784321536?s=20&t=UX8VOFku_i88dGhti3mtjQ
Sinner EX MLA Rajabhau Vaje Daughter Wedding Today