India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी आमदार राजाभाऊ वाजेंच्या कन्येचा आज शुभविवाह; हा आहे त्यांचा जावई

India Darpan by India Darpan
February 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी हिचा आज शुभविवाह होत आहे. सिन्नर-शिर्डी रोडवरील एस जी पब्लिक स्कूलच्या पटांगणात आज गोरज मुहूर्तावर होत आहे. त्यानिमित्त विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.

माजी आमदार प्रकाश वाजे यांची नात आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची कन्या चि सौ का मानसी हिचा विवाह चि. संकेत यांच्याशी होत आहे. संकेत हे भारतीय रेल्वे पोलिस दलात अधिकारी आहेत. संकेत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील लोणी येथील रहिवासी आहेत. अॅड. श्री. गोकुळराव जगन्नाथ धावणे यांचे ते सुपुत्र आहेत. अॅड धावणे हे वकील आहेत.

काल मा.आमदार राजाभाऊ वाजे जी यांच्या सुकन्या चि.सौ.कां. मानसी आणि चि.संकेत यांस शुभविवाहानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/HcmwUiNs0t

— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 7, 2023

राजाभाऊ वाजे हे  २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमधून आमदार झाले होते. वाजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा झडत होत्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, ते ठाकरे गटाबरोबरच असल्याचे सांगितले जाते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वाजे यांच्या घरी शुभकार्य असल्याने आदित्य ठाकरे यांनी काल रात्रीच सदिच्छा भेट देऊन वधूवरांना शुभाशिर्वाद दिले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही भावी दाम्पत्यास भेटून शुभेच्छा दिल्या व भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या. याप्रसंगी उदय सांगळे, राजेंद्र जगझाप, राजेंद्र भगत तसेच वाजे आणि धावणे कुटुंबातील सदस्य यावेळेस उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे हे सुद्धा आज सायंकाळी विवाह समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

आपण सर्वांनी हेच निमंत्रण समजून उपस्थित राहावे, ही पुनश्च विनंती.
मंगळवार,दि.०७/०२/२०२३
सायंकाळी ६ वाजता
स्थळ- एस.जी.पब्लिक स्कूल पटांगण. सिन्नर-शिर्डी रोड,सिन्नर,जि.नाशिक.

समस्त वाजे परिवार,सिन्नर pic.twitter.com/kFbd7UGGEJ

— Rajabhau Waje (@RajabhauW) February 3, 2023

Sinner EX MLA Rajabhau Vaje Daughter Wedding Today


Previous Post

वेल्डिंगचे काम करतांना लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक; वेल्डिंग करणारा गंभीर जखमी

Next Post

नाशिकहून गोवा, नागपूर आणि अहमदाबाद अवघ्या २ तासात…. ते सुद्धा अवघ्या अडीच हजारात… इंडिगोच्या विमानसेवेचे बुकींग सुरू…

Next Post

नाशिकहून गोवा, नागपूर आणि अहमदाबाद अवघ्या २ तासात.... ते सुद्धा अवघ्या अडीच हजारात... इंडिगोच्या विमानसेवेचे बुकींग सुरू...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group