नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम्ही ब्राह्मण, बुध्दीजिवी आणि स्वाभिमानी आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन गायिका अमृता फडणवीस यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील सर्व शाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाज संस्थांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आपण आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी काय करायचे ते आपण सर्व मिळून करुया. सर्व शाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि दैनंदिन व्यवहारांवर एकत्रित चर्चा व्हावी. या चर्चेतून सर्वसमावेशक आणि समाजाला उपयोगी पडेल असे निर्णय घेणे शक्य आहे. म्हणून या दिपावली स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही ब्राह्मण, बुध्दीजिवी आणि स्वाभिमानी आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अविनाश भिडे यांनी समाजाच्या आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विशेषतः ग्रामीण भागातील समाज बांधवांना सहाय्यभूत होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी. त्यांना आरक्षणाची संधी निर्माण करुन द्यावी.
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी यावेळी परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावे, नाशिक त्र्यंबकेश्वर कॅरिडॉर विकसित करावा, असा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सुरेश मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतिश शुक्ल होते, आभार भगवंतराव पाठक यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर स्वामी अनिकेत शास्त्री, महंत भक्तचरणदास महाराज, माजी महापौर सतीश कुलकर्णी, उदयकुमार मुंगी, शांताराम शास्त्री भानोसे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि मंत्रोच्चाराने झाली. सर्व सवाष्णींची पैठणी देवून ओटी भरण्यात आली. मान्यवरांचा पगडी,महावस्त्र आणि स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. प्रवीण कुलकर्णी, ॲड.सतीश बालटे, धनंजय पुजारी, ॲड.समीर जोशी, योगेश बक्षी,चंद्रशेखर जोशी, अनिल देशपांडे, निलेश देशपांडे, महेश शुक्ल, संजय बेलापूरकर, प्रदिप भानुवंशे, सुचेता भानुवंशे, सौ.वृषाली घोलप, सौ.मंजु जाखडी, सौ. गौरी कुलकर्णी, सौ.मोहिनी कुलकर्णी, सौ .ललिता गायधनी,सौ. वैभवी पिल्लदे,महेश बोरगावकर, अनिल नांदुर्डीकरकर,संदेश पाठक, तुषार कुलकर्णी, ॲड.भानुदास शौचे भणगेकाका,सुहास टिपरे सौ.सायली भोसेकर,सौ. संजीवनी सौंदनकर,सौ. प्रज्ञा वणीकर,सौ. स्मिता कुलकर्णी, सुचिता देशमुख,रमा घरोटे, अश्विनी कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.
Singer Amruta Fadanvis on Brahman Community Statement