मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोलचे भाव वाढल्यापासून लोकांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढत चालला आहे. अश्यात दिग्गज कंपन्यांपासून स्टार्ट-अपपर्यंत अनेकांनी इलेक्ट्रीक वाहनांच्या प्रॉडक्शनमध्ये उडी घेतली आहे. एका चार्जिंगमध्ये किली किलोमीटर गाडी धावणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो आणि या प्रश्नाचं अशक्य वाटणारं उत्तर देणारी एक कंपनी सध्या देशात चर्चेत आहे.
इलेक्ट्रीक दुचाकींच्या बाबतीत बहुतांश कंपन्या एका चार्जींगमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची खात्री देतात. त्यातल्या त्यात काही कंपन्या शंभरपेक्षा जास्त किलोमीटर गाडी धावेल, असे एखाद्या कंपनीने म्हटले तरीही प्रत्यक्षात त्याची खात्री नसते. परंतु, बंगळुरूच्या स्टार्ट-अप सिंपल एनर्जी या कंपनीने एका चार्जींगमध्ये तब्बल २१२ किलोमीटर इलेक्ट्रीक दुचाकी धावेल, असा दावा केला आहे. कंपनीने ही सूकटर लॉन्च केली आहे.
कालच, २३ मे रोजी ही इलेक्ट्रीक दुचाकी लॉन्च झाली आहे. कंपनीने या स्कुटरला सिंपल वन असे नाव दिले असून दोन वर्षांपूर्वी वेगवान इलेक्ट्रीक स्कुटर लॉन्च करण्याचा दावा केला होता. तेव्हापासून सातत्याने कंपनीची आणि स्कुटर कधी लॉन्च होणार याची चर्चा सुरू होती. स्कुटरच्या चाचणीला दोन वर्षे लागल्याचे कंपनीचे सीईओ सुहास कुमार यांनी म्हटले आहे.
सर्वोत्तम गाडी देण्यासाठी दोन वर्षे काम करावे लागले, असे त्यांचे म्हणणे होते. या चाचणीदरम्यान अनेक बदल करण्यात आले. ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत मार्केटमध्ये उपलब्ध इतर कोणत्याही इलेक्ट्रीक वाहनांच्या तुलनेत हे स्कुटर उत्तम असेल असा दावा करण्यात आला आहे. जगभरातील ग्राहकांच्या मानकांना गाठण्याचा कंपनीने पूर्ण प्रयत्न केला आहे, हे विशेष.
ही आहेत वैशिष्ट्ये
सिंपल एनर्जीच्या स्कुटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीसाठी जास्तीत जास्त सुरक्षिततेची खात्री देते. या इलेक्ट्रीक स्कुटरमध्ये ८.५ kw क्षमतेची इलेक्ट्रीक मोटर वापरली गेली आहे. यात ४.८ kwh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. त्यामुळे एका चार्जिंगमध्ये २१२ किलोमीटरपर्यंत गाडी धावू शकते. ६ जूनपासून या दुचाकीची डिलेव्हरी दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने ग्राहकांना दिली जाईल, असे नियोजन कंपनीने केले आहे.
Simple one Electric Scooter EV Features