बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीराम नवमी विशेष…. कोट्यावधी हिंदूंचे आदर्श श्रीराम… नागपूरची ४८ वर्षांची परंपरा असलेली शोभायात्रा..

by Gautam Sancheti
मार्च 30, 2023 | 5:24 am
in इतर
0
shriram

 

कोट्यावधी हिंदूंचे आदर्श श्रीराम

भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात मर्यादा पुरुषोत्तम अशी ओळख असलेल्या आणि श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणून भगवान श्रीरामाच्या जन्मा प्रित्यर्थ श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भारतभर साजरा केला जातो. कौटुंबिक जीवनात एखाद्या व्यक्तीने कसे आदर्श जीवन जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण आणि आदर्श म्हणून भारतीय समाजात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची मनोभावे पूजा केली जाते. भगवान श्रीरामाचे जीवन हे कोट्यावधी हिंदूंचे आदर्श आहे, त्यामुळेच पदोपदी श्रीरामाच्या जीवनातील दाखले दिले जातात.

Dr Pravin Mahajan
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111

चैत्रशुद्ध नवमीच्या दिवशी पुष्य नक्षत्रावर माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी माध्यावर पाच ग्रह असताना अयोध्या येथे भगवान श्रीरामचंद्राचा जन्म झाला. कोणतीही देवता व अवतार यांच्या जन्मतिथिला त्यांचे तत्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीरामनवमीला श्रीरामतत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते. श्रीरामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते, असेही मानले गेले.

देशभरातील जवळपास सर्व मंदिरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव अविरत चालतो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून रामनवमी उत्सवाची सुरुवात करण्यात येते. पाडवा पहाटने वातावरण शुद्ध होते. प्रभू गीतांनी मने शुद्ध होतात, नंतर नऊ दिवस म्हणजेच श्रीराम जन्मापर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन असते. या दरम्यान ठीक ठिकाणी रामनामाचे पारायण, गीत रामायण, कथा, कीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार करून हा उत्सव साजरा होत असतो.

रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्माच्या किर्तनाने रामाचा जन्म आपण सर्वसाधारण करतो. अनेक ठिकाणी बाळरामाची मूर्ती किंवा नारळाला वस्त्रामध्ये गुंडाळून हे नारळ पाळण्यात ठेवून भगिनी पाळणा हलवतात. भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळून राम जन्माचा जयघोष करीन मनोभावे पूजा करतात. रामनवमीच्या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे सुंठवडा असतो. महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित्र मानस लिहिण्यास सुरुवात केली होती.

श्रीरामासारखे उज्वल चरित्र जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेच नाही, हे त्रिवार सत्य आहे. ईश्वराचा राम हा अवतार म्हणजे समाजमनाची दृढ श्रद्धा आहे. रामाचे आचार, रामाचे विचार आणि रामाचे वर्तन असे होते की, राम सर्वांना आदर्श माणूसच वाटत असे. असामान्य, अलौकिक आणि कर्तुत्वान व्यक्ति म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या जीवनात राम होण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, नाहीतर आज मुह मे राम और बगल मे छुरी असेच दिसते. रामाचा प्रत्येक गुण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे.

आपल्या नंतर आयोध्येचा उत्तराधिकारी कुणाला करायचे असा विचार राजा दशरथ करीत असताना, आयोध्येतील प्रजेने रामाला राजा करण्याचा आग्रह धरला होता. राम खूपच लोकप्रिय होते आणि प्रजेचे भरपूर प्रेम त्याना मिळत होते, मात्र माता कैकयीने भगवान रामाला सांगितले की आयोध्याच्या गादीवर भरताला बसवावे आणि तू चौदा वर्षे वनवासात जावे, अशी महाराजांची इच्छा आहे. दशरथ राजांचा हा निर्णय ऐकल्यानंतर रामाच्या चेहऱ्यावर कोणती दुःख या भाव नव्हते. श्रीरामाने चौदा वर्षे वनवासात जाण्याचा निर्णय घेतला.

राम वनवासात जाणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण अयोध्या नगरी त्यांच्यासोबत जाण्यास निघाली होती. लक्ष्मण तर रडत होते. या सर्वांची समजूत काढता, काढता राम थकून गेले. तुमचे खरोखरच माझ्यावर प्रेम असेल तर माघारी फिरा. मला पितृ वचनाचे पालन करू द्या, अशी विनंती रामाने केली, तरीही प्रजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रजेचे स्वार्थरहीत प्रेम मिळविण्याचे काम श्रीरामासारखी अलौकिक व्यक्तीच करू शकते. जगामध्ये अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत आणि पुढे होतील परंतु राम राज्याचा काळ लोटून हजारो वर्षे झाली तरी रामाचे विस्मरण संस्कृती उपासकांना झाले नाही, यातच भगवान श्रीरामाचे श्रेष्ठत्वाचे गमक आहे.

रामाने एवढी वर्ष वनवासात काढली अशी कल्पना करताना देखील आजही भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. कर्तव्यनिष्ठा हेच भगवान श्रीरामाच्या जीवनाचे प्रमुख ध्येय होते. राम देव होता म्हणून वाल्मिकी ऋषींनी रामाचे चरित्र चित्रण केले नाही. अनेक आपत्ती सहन करून दुःख भोगून देवत्व मिळवलेली व्यक्ती म्हणजेच श्रीराम असे त्यात त्यानी म्हटले आहे.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा कोट्यावधी भाविकांचा आवडता देव असल्याने रामनवमीच्या दिवशी लोक व्रत ठेवतात. हे व्रत ठेवण्याच्या अनेक पद्धती आहे. अनेक लोक व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटवून श्रीरामाचे नामस्मरण करतात, त्यानंतर दुसरे दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहूर्ताला उठून घर स्वच्छ करतात आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घेतात त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र केली जातात. घरादारावर आंब्याचे तोरण लावले जाते.

नागपूरातील सर्वच राममंदीरातर्फे श्रीराम जन्मोत्सव दरवर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. गेल्या 50 वर्षापासून पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम नवमीच्या दिवशी रामनगर येथील राम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदा शोभायात्रेचे 48 वे वर्ष आहे. महाराष्ट्राचे युवा, तडफदार व लोकप्रिय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षापासून या शोभायात्रेचे आधारस्तंभ आहे. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून, विद्यार्थी परिषदे काम करीत असताना, या नंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे वार्ड अध्यक्ष, संत्रा नगरीचे सर्वात युवा महापौर, 92 ते 97 असे सलग दोन वेळा नगरसेवक, 1999 पासून सलग पाच वेळा आमदार, नंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्याचे युवा मुख्यमंत्री, तर आता उपमुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा चढता आलेख असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी रामनवमीच्या शोभायात्रेत आपला सहभाग कधीही चुकू दिला नाही. या ईश्वरी कार्यायात ते नेहमीच आमच्या सोबत असतात.

नागपूरचे सुपुत्र, नागपूरची वेगळी ओळख निर्माण करणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचाही सहभाग या शोभा यात्रेच्या निमित्ताने नेहमीच राहत आलेला आहे. रामभक्त माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार विलासभाऊ मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, सुप्रसिध्द अ‍ॅडव्हाकेट आनंद परचुरे यांचे सहकार्य व पाठींबा यासोबतच अनेक कार्यकर्त्यांच्या हाताने हा रथ अविरत पुढे पुढे जात आहे, हीच प्रभू श्रीराम रायाची कृपा म्हणावी लागेल.

डॉ. प्रवीण महाजन,
रामभक्त व जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य,
महाराष्ट्र शासन
Shriram Navami Special Article Nagpur Shobhayatra by Pravin Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

५ लाख रुपये किलो केसर… ६ हजार रुपये किलो वेलची… १ हजार वर्षांची परंपरा…. अशी आहे भारतीय मसाल्यांची खासियत

Next Post

शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ८० लाखांची फसवणूक… व्यापारी फरार… शेतकऱ्यांची पोलिसात धाव…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250903 WA0169
राज्य

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ठप्प

सप्टेंबर 3, 2025
504964666 10162987121630185 6970881276982871830 n e1756878957672
संमिश्र वार्ता

मराठ्यांची फसवणूक? विधीज्ञ असीम सरोदे यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न

सप्टेंबर 3, 2025
fir111
क्राईम डायरी

कर्जाच्या वसूलीसाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ…फायनान्स कंपनी विरुध्द गुन्हा दाखल

सप्टेंबर 3, 2025
jail1
क्राईम डायरी

बसमध्ये चढतांना प्रवाशांच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या अहिल्यानगर येथील टोळीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

सप्टेंबर 3, 2025
Screenshot 20250903 090638 Facebook
संमिश्र वार्ता

गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट…वैवाहिक आयुष्याची १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर घेतला निर्णय

सप्टेंबर 3, 2025
Untitled
महत्त्वाच्या बातम्या

हा जीआर म्हणजे फक्त कागद कोणालाही फायदा नाही…विनोद पाटील यांचा गंभीर आरोप

सप्टेंबर 3, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

असा घेतला तातडीने निर्णय…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

सप्टेंबर 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

कुणबी जातीचे प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समित्या….शासन निर्णय निर्गमित

सप्टेंबर 3, 2025
Next Post
tomato e1654233858458

शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ८० लाखांची फसवणूक... व्यापारी फरार... शेतकऱ्यांची पोलिसात धाव...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011