रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – श्री गंगा गोदावरीच्या उगमस्थानी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीगंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा अर्थात दशहरा उत्सवास २२ जानेवारीपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. कुशावर्त तिर्थाजवळील श्री गंगा गोदावरी मंदिरात माघ शुध्द प्रतिपदा, रविवार, २२ जानेवारी ते माघ शुध्द द्वादशी, गुरूवार २ फेब्रुवारी पर्यंत श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे. यानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी ७ वाजता तिर्थराज कुशावर्त पुजन, ७ .३० वाजता श्री गंगा गोदावरी पुजन, ८ .३० वाजता श्री दुर्गा सप्तशती पाठ, ९ .३० वाजता शुक्ल यजुर्वेद पारायण तर सायंकाळी ७ वाजता आरती, मंत्र पुष्पांजली व शांती पाठ असे नित्य कार्यक्रम आहे. माघ शुध्द नवमी पर्यंत दररोज सकाळी विविध यजमानांचे हस्ते अनुक्रमे उदक शांत, देवी अथर्वशिर्ष, ब्रह्मणस्पती सुक्त, पुरुष सुक्त, लघुरुद्र अभिषेक, सप्तशती अभिषेक, सौर सुक्त, श्रीसुक्त, असे विविध धार्मिक कार्यक्रम तर दुपारी ५ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची प्रवचने संपन्न होणार आहेत. माघ शुद्ध दशमी, सोमवार, ३० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ह.भ.प. सौ. श्रध्दा चंद्रशेखर शुक्ल यांचे जन्मोत्सवाचे किर्तन होईल. माध्यान्ह काळी श्री गोदावरी मातेचा जन्मोत्सव होईल. तर सायंकाळी ७ वाजता कुशावर्त तिर्थावर नयनरम्य दिपोत्सव सोहळा संपन्न होईल. माघ शुध्द दशमी, मंगळवार, ३१ जानेवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण पुजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन, बुधवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता विष्णु सहस्त्र नाम व गिता पठण, अभिषेक तर सायंकाळी पाच वाजता भव्य पालखी सोहळा संपन्न होईल. माघ शुध्द १२, गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रक्षालन पुजा तर दुपारी १२ वाजता थेटे मंगल कार्यालयात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होईल. अशी माहिती श्री गंगा गोदावरी मंदिर संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक भास्कर तथा बाळासाहेब दिक्षित यांनी दिली.
दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात सौ. स्वाती मनोज थेटे, सौ. मिनाक्षी रामचंद्र कळमकर, सौ. प्रणिता कौस्तुभ पाटणकर, सौ. सुवर्णा योगेश देवकुटे, सौ. पल्लवी मोहिनीराज शिंगणे, सौ. स्मिता मिलिंद मुळे या महिला भगिनी प्रवचन सेवा बजावणार आहेत. श्री गंगा दशहरा महोत्सवात प्रवचनकार म्हणून प्रवचनाची सेवा सर्व महिला भगिनी बजावणार आहे, हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्ये ठरणार आहे. दरम्यान या संपूर्ण सोहळ्यात विविध कार्यक्रमांसाठी सतिष सरडे, निषाद चांदवडकर, रमेश पाटणकर, आशुतोष महाजन, शामराव लोहगांवकर, सुधीर शिखरे, मनोज थेटे, उदय दीक्षित, निलेश जोशी, सौ. भारती वैद्य, लक्ष्मीकांत थेटे हे यजमानपद भुषविणार आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी रविंद्र चांदवडकर, गणेश भुजंग, मोहन लोहगावकर, निलेश जोशी, कार्यकारीणी सदस्य विश्वनाथ वाडेकर, संजय दीक्षित, लक्ष्मीकांत थेटे, विजय शिखरे, अनंत थेटे, सुनिल शुक्ल, सुनिल देवकुटे, उदय दीक्षित, रत्नाकर जोशी, राजेश दीक्षित, लोकेश अकोलकर, ललित लोहगांवकर, मंगेश दिघे, ऋषीकेश देवकुटे, ग्रामाचार्य संजय मुळे, लिपिक शैलेंद्र जोशी, उत्सव समिती सदस्य संतोष ढेरगे, मनोज ढेरगे, ओमकार नाकील, पराग मुळे, प्रसन्ना जोशी, कृपेश भट, सुयोग शिखरे, मयुरेश दीक्षित, सचिन दिघे, सौरभ दीक्षित, जयदिप शिखरे, अक्षय लाखलगावकर, विनय ढेरगे, अजिंक्य शुक्ल, अलोक लोहगांवकर आदी परिश्रम घेत आहेत. भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.