नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चित्पावन ब्राह्मण संघाची परशुराम भवन ही भव्य वास्तू जुन्या सीबीएसजवळ दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवारी ( दि.१ जून ) रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण केले जाईल. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, कार्यवाह नितीन सहस्त्रबुद्धे, कोषाध्यक्ष हेरंब घारपुरे यांनी दिली.
दुपारी ३ वाजता कॉलेजरोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुदक्षिणा सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन चित्पावन ब्राह्मण संघाचे विश्वस्त मंडळाचे प्रा.दिलीप फडके, प्रा.प्रभाकर केळकर, देवेंद्र बापट, विवेक गोगटे, डॉ. विजय काकतकर आणि अनिरुद्ध अभ्यंकर, अभय खरे, मंगला जोगळेकर ,देवदत्त जोशी, श्रीरंग वैशंपायन, सुधीर दामले, मैथिली गोखले, सुवर्णा सहस्रबुद्धे, सुशील सहस्रबुद्धे, डॉ.अजित कुमठेकर, हेमंत वाड, विद्यासागर जोशी या कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.