गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

किराणा दुकानदार ते राष्ट्रपती; असा आहे रामनाथ कोविंद यांचा भन्नाट जीवन प्रवास

ऑक्टोबर 22, 2021 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
ramnath kovind

नवी दिल्ली – देशाचे १४ वे राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंद यांच्या खासगी आयुष्याबद्दलची माहिती तुम्हाला ठाऊक आहे का? शालेय जीवनात वडिलांच्या अनुपस्थितीत किराणा दुकान सांभाळणारे रामनाथ कोविंद, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी नाकारणारे रामनाथ कोविंद आणि वकिली करून नंतर राजकारणात प्रवेश करणारे रामनाथ कोविंद यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणे सर्वोच्च सन्मान समजला जातो. या पदावर विराजमान झाल्यानंतर सिंहावलोकन करताना या पदापर्यंतची त्यांची वाटचाल निश्चित सोपी नव्हती. कसा होता रामनाथ कोविंद यांचा प्रवास, याबद्दलची आणखी काही रोच माहिती जाणून घेऊयात.

कुटुंबातील टोपण नाव
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परोख या गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला होता. पाच भावांमधील सर्वात लहान रामनाथ कोविंद यांना कुटुंबात लल्ला असे म्हटले जायचे. आई-वडिलांच्या निधनानंतर वहिनी विद्यावती यांनी त्यांना वाढविले. वहिनींना ते आईच्या जागी मानतात. वहिनी विद्यावती यांनी बविलेला कढी-भात रामनाथ कोविंद यांना खूपच आवडत असे.

किराणा दुकान बसणारे रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद लहान असताना त्यांचे वडील मैकुलाल कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परोख या गावात किराणा दुकान चालवत होते. त्यांचे वडील ग्रामस्थांना आयुर्वेदिक औषधेही देत होते. शाळेतून परतल्यानंतर रामनाथ कोविंद वडिलांचे दुकान सांभाळत होते. त्या दिवसांत त्यांच्याकडे शेतीसाठी जमीन नव्हती. रामनाथ कोविंद यांचे भाऊ प्यारेलाल यांचे आजही किराणा दुकान आहे.

यूपीएससीची नोकरी नाकारली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्राथमिक शिक्षण संदलपूर प्रखंड येथील शाळेत झाले होते. पुढे त्यांनी डी.ए.व्ही. महाविद्यालयातून बी. कॉम, आणि डी.ए.व्ही. विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा तिसर्या प्रयत्नात उत्तीर्ण केली होती. त्यांची संबद्ध सेवेतही नियुक्ती झाली होती. परंतु त्यांनी ही नोकरी नाकारली. १९७७ पासून १९९३ पर्यंत १६ वर्षे दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. १९७८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली होती. १९७७ ते १९७९ पर्यंत ते दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील तसेच १९८० ते १९९३ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे कायमस्वरूपी सल्लागार होते.

पहिल्या निवडणुकीत स्कूटरवर प्रचार
आपल्या राजकीय कारकीर्दीत राष्ट्रपती कोविंद यांनी प्रथम १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वाहन मिळू न शकल्याने त्यांनी गावागावात स्कूटरवरून प्रचार केला होता. या निवडणुकीत ते पराभूत झाले. एप्रिल १९९४ मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर ते दोन वेळा १२ वर्षांपर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. १९९४ मध्ये राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतरही ते कानपूर येथील कल्याणपूरमध्ये जवळपास एक दशकापर्यंत भाड्याच्या घरात राहिले होते. ८ ऑगस्ट २०१५ ते २५ जुलै २०१७ या काळात ते बिहारचे राज्यपाल होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असे आहे पालघर जिल्ह्याचे योगदान

Next Post

जिओचा अतिशय तगडा प्लॅन: ३६५GB डेटा आणि मोफत कॉलिंग अवघ्या २ रुपयांत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
jio

जिओचा अतिशय तगडा प्लॅन: ३६५GB डेटा आणि मोफत कॉलिंग अवघ्या २ रुपयांत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011