शनिवार, नोव्हेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचले का ?

नोव्हेंबर 10, 2021 | 4:31 pm
in इतर
0
20211110 162354

 

नाशिक – जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे शोध.. नेहरु – गांधी पर्वाचा हे पुस्तक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले आहे. मोतीलाल नेहरु ते राहुल गांधी पर्यंत पाच पिढ्यांचा सव्वाशे वर्षाच्या राजकीय वाटचालीचा समग्र लेखाजोखा एकत्रितपणे सादर करणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. पुणे येथील मनोविकास प्रकाशनाचे हे पुस्तक तब्बल ७५८ पानाचे असून याला विचारवंतर पत्रकार आणि राज्यसभेचे विद्यमान सदस्य कुमार केतकर यांची प्रस्तावना आहे.
IMG 20211109 WA0161या पुस्तकाचे प्रकाशन करतांना जेष्ठ नेते शरद पवार यांचे मनोगतही बोलके आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीतील राजकीय घडामोंडीचा सूक्ष्म अभ्यास असलेले जेष्ठ पत्रकार, संपादक सुरेश भटेवरा यांच्या शोध .. नेहरु – गांधी पर्वांचा या ग्रथांचे प्रकाशन करतांना विशेष आनंद होत आहे. मोतीलाल नेहरुंपासून ते राहुल गांधीपर्यंत पाच पिढ्यांचा सुमारे सव्वाशे वर्षाचा अविरत प्रवास या ग्रंथात मांडण्यात आला आहे. त्यांचे देशासाठी योगदान, संघर्ष, त्यांचे आयुष्य आणि देशावर पडलेला प्रभाव याला केंद्रबिंदू ठेवून देशाच्या सांगोपांग वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सांप्रत काळात असे पुस्तक वाचकांच्या हाती असणे आवश्यक होते. ग्रंथात या कुटुंबाचा अतुलनीय त्याग व बलिदान यांचा लेखाजोखा अप्रतिमरीत्या मांडण्यात आला आहे. लोकशाही मूल्यांची जपणूक होण्यासाठी हा ग्रंथ घरोघरी पोहचायला हवा. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रकाशक अरविंद पाटकर हे उपस्थित होते. त्यांनी सुध्दा पुस्तकाच्या निर्मितीची माहिती दिली.

काय आहे पुस्तकात
मोतीलाल नेहरु
– असे घडले मोतीलाल
– सक्रिय राजकारणात मोतीलाल
– अमृतसर अधिवेशनाचे अध्यक्ष
– स्वराज पार्टीची स्थापना
– नेहरु रिपोर्ट
– महानिर्वाण
जवाहरलाल नेहरु
– कमला आणि जवाहरलाल
– नऊ वर्षाचा तुरुंगवास
– भारताची फाळणी आणि पंडित नेहरु
– पंडित नेहरु, सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस
– पंतप्रधान नेहरु
– परऱाष्ट्र धोरण आणि काश्मिर
– आधुनिक भारताची उभारणी
पंडित नेहरुंचे योगदान
– व्यक्तिमत्वाच्या विविध छटा
– भारत – चीन बुध्द आणि नेहरु
– प्रसन्न नेत्याचा अखेरचा प्रवास

इंदिरा गांधी
– जोन ऑफ आर्क
– फिरोज आणि इंदिरा
– प्रेमविवाह दु:खान्त
– राष्ट्रीय राजकारणाचा परिघात
– वादळावर स्वार ….आक्रमक छाप
– देदीप्यमान दुर्गा .. इंदिरा
– सिक्कीमचे भारतात विलीनीकरण
– आंदोलनाची लाट…आणिबाणीची घोषणा
– संजय गांधी…आणिबाणी आणि पराभव
– सूडयात्रा.. संघर्ष.. बेलचीचा दौरा
– सत्तेत शानदार पुनरागमन…संजयचे निधन
– ऑपरेशन ब्लू स्टार .. इंदिरा गांधीची हत्या
– अंतिम यात्रा अन सोनेरी ज्वाळा
राजीव व सोनीया गांधी
– राजीव आणि सोनीया
– राजकारणात प्रवेश ते पंतप्रधानपद
– पंतप्रधान राजीव गांधीची कारकिर्द
– बोफोर्स ..शहाबानो.. शिलान्यास आणि श्रीलंका
– राजीव गांधी हत्या
– हत्या, की राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कारस्थान
– नरसिंहराव आणि सोनीया
– केसरींचा कालखंड आणि सोनीया गांधी
– शरद पवार आणि सोनीया गांधी
– मैदानात उतरल्या सोनीया
– पंतप्रधानपदाचा त्याग
राहुल… प्रियंका.. वरुण गांधी
– राजकारणात पाचवी पिढी
– कँाग्रेस अध्यक्ष राहुल .. लोकसभेची निवडणूक
– अध्यक्षपद सोडल्यानंतर
– आव्हाने पर्वताएवढी
– संघर्षरत प्रियंका
– वेगवेगळ्या वाटेवर वरुण गांधी
पुस्तकाची किंमत – ८५० रुपये
20211110 160653 scaled

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत: माथाडी कामगार संपाचा कांदा लिलावाला फटका; ६ कोटींची उलाढाल ठप्प

Next Post

रब्बीसाठी हरबरा, गहू, ज्वारी व मका यांचे अनुदानित बियाणे हवे आहे? असा घ्या लाभ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रब्बीसाठी हरबरा, गहू, ज्वारी व मका यांचे अनुदानित बियाणे हवे आहे? असा घ्या लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011