नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी आयोगाने गोठविली आहे. त्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळाले आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, शिंदे गटाला आयोगाने सांगितले आहे की, चिन्हासाठी नवीन तीन पर्याय द्यावेत. दोन्ही गटांना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मिळाले आहे.
ठाकरे गट
नाव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
चिन्ह – मशाल
शिंदे गट
नाव – बाळासाहेबांची शिवसेना
चिन्ह – अद्याप निर्णय नाही
https://twitter.com/LiveLawIndia/status/1579488996090343427?s=20&t=mF7yYWAMficsMEVVMwGmgQ
Shivsena Shinde And Thackeray Group Name Symbol