बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राऊतांकडे सापडलेल्या पैशांवरुन तर्कवितर्कांना उधाण; राजकीय वातावरणही तापले

by India Darpan
ऑगस्ट 1, 2022 | 11:56 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला आणि ११ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही रक्कम अघोषित उत्पन्नातून असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या बंडलवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, १० लाखांची रक्कम ही शिवसेना पक्ष निधीची आहे. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे अयोध्येचाही उल्लेख करण्यात आला. यावर आता एकनाथ शिंदे गटानेही संजय राऊत यांचा धूर्तपणा असू शकतो, असे उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत अतिशय हुशार असून त्यांनी मुद्दाम एकनाथ शिंदे यांच्या नावावर १० लाख रुपये ठेवले असावेत.

केसरकर पुढे म्हणाले की, ‘कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काहीतरी करायचे असेल. त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे आहे. संजय राऊत यांनी हा पैसा त्यांच्यासाठी राखून ठेवला असावा. या पैशाचा स्रोत दाखवावा लागेल. संजय राऊत यांनी हे पैसे जाणूनबुजून ठेवले असावेत, अशी भीतीही दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. या पैशावर संजय राऊत यांनी मुद्दाम एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिले असेल तर ती फार मोठी चलाखी असू शकते. ते काहीही करू शकतात. या पैशाशी एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे दिल्याचे आरोप झाले. तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या खोल्या आणि घरांची झडती घेण्यास सांगितले होते, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथील सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊत यांच्या घरी मिळालेल्या पैशांवर माझे नाव असेल तर त्यांनाच विचारा. मी अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी ईडीला सांगितले की, ११.५० लाख रुपयांपैकी १० लाख रुपये पक्ष निधीचे आहेत. मात्र, त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे नाव का लिहिले गेले? याची चर्चा जोरात सुरू आहे.

दरम्यान, ही कारवाई शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी असल्याचे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी आरोप केला आहे. अशा कारवायांमुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही. सुडातून ही कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा आवाज थांबणार नाही.  शिवसैनिकांचा आवाज त्याच जोमाने ऐकू येईल. संजय राऊतच लढतील आणि शिवसेनेला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ShIvsena Sanjay Raut Home Cash Money Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संजय राऊत यांना ईडीकडून अटक; नाशिकमध्ये शिवसैनिकांचे आंदोलन

Next Post

रोज सकाळी ८ वाजता वाजणारा सायरन बंद झाला; एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रीया

India Darpan

Next Post
eknath shinde cm

रोज सकाळी ८ वाजता वाजणारा सायरन बंद झाला; एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011