नाशिक – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे बुधवार, ९ जूनपासून उत्तर महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत हे बुधवारी सायंकाळी नाशिक येथे येतील. गुरूवारी, १० जून रोजी दुपारी दोन वाजता धुळे येथे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. शुक्रवार, ११ जूनला सकाळी साडेनऊ वाजता नंदुरबार येथे बैठक होईल. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक चोपडा येथे होणार आहे. शनिवार, १२ जून रोजी जळगाव येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक सकाळी साडेनऊ वाजता होईल. रविवार, १३ जूनला सकाळी साडेनऊ वाजता दिंडोरी, तर साडेअकरा वाजता नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक होईल. या सर्व कार्यक्रमांना जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, शहर संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, उपजिल्हाप्रमुख, महानगर संघटक, विधानसभा संघटक, युवासेना जिल्हा युवा अधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा संघटक, महिला जिल्हा संघटक हे हजर राहणार आहेत.