रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिवसेना खासदार संजय राऊतः मी आज फक्त ट्रेलर आणला, आता पुढे कसे चित्रपट येतात बघा

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 15, 2022 | 3:52 pm
in मुख्य बातमी
0
FLoOOP1XIAY5LUj

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आज येथे झाली. ठाण्यातील शिवसेना भवनात झालेल्या या परिषदेत राऊत यांनी भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्यावतीने निष्पापांचा कसा छळ सुरू आहे इथपासून ते भाजप नेत्यांचे अनेक दलालांशी कसे संबंध आहेत हे राऊत यांनी कथन केले.
बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असे
– ही लढाईची सुरुवात आहे
– महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या पत्रकार परिषदेला आशिर्वाद दिले आहेत
– मराठी माणूस बेईमान नाही
– कितीही पाठीत वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही
– केंद्रीय तपास यंत्रणांचा सतत गैरवापर आणि दबाव सुरू आहे
– भाजप नेते कुणाच्या भरवशावर अनेक दावे करीत आहेत की १० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार जाईल
– भाजपचे नेते मला भेटले आणि शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी त्यांनी मला दिल्लीत सांगितले
– राष्ट्रपती राजवट लावायची आहे किंवा काही आमदार फोडून आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे
– तुम्ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील
– जे भाजप नेते भेटले त्यांची नावे आता सांगणार नाही
– तुम्हाला पश्चाताप होईल मदत न केल्याचा अशी धमकी दिली भाजप नेत्यांनी
– सतत धमक्या येत आहेत.
– मला भाजप नेते भेटल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून ईडीचे छापे सुरू झाले
– महाराष्ट्रात सत्ता आली नाही म्हणून भाजप नेते सूड घेत आहेत
– माझा नातेवाईक आणि मित्र परिवाराला टार्गेट केले. त्यांच्यावर छापे टाकले
– माझ्या मुलांनाही धमकीचे फोन आले. हा अत्यंत नालायकपणा भाजपद्वारे सुरू आहे
– आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयसमोरच घ्यायची होती. मात्र, आज सुरुवात शिवसेना भवनातून केली आहे आता अंत ईडीच्या कार्यालयात करु
– दलालाला भडवे म्हणतात.
– दलालाने आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे १९ बांधले. आपण ४ गाड्या बुक करु आणि ते बंगले पाहून येऊ. ते दिसले नाही तर दलालाला जोड्याने मारु
– जे बंगले सांगितले जात आहेत त्या बंगल्यात बसून पार्टी करु आपण
– सोमय्या मराठी भाषेविरोधात कोर्टात गेले हे तेच आहेत
– माझे आरोप करणाऱ्यांना आव्हान आहे, पाटणकरांनी कर्जतमध्ये देवस्थानांची जमीन कुठे, केव्हा आणि कशी घेतली हे दाखवा, सिद्ध करा
– आनंदराव अडसूळ, भावना गवळी, अशा अनेक नेत्यांना टार्गेट केले जात आहे
– त्यांनी केलेला प्रत्येक आरोप खोटा आहे
– माझे स्वतःचे सर्व बँकांचे २० वर्षांचे बँक डिटेल्स ईडीचे लोक घेऊन गेले
– माझ्या अलिबागमधील ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करते आहे
– पहाटे चार वाजता उठून गावातील लोकांना उचलून ईडीच्या कार्यालयात नेत आहेत.
– आम्हाला संजय राऊत यांच्या विरोधात लिहून दे अशी धमकी दिली जाते आहे
– ५० ते ५५ गुंठ्याची जमिनीची चौकशी करताय. धमकी, दादागिरी केली जाते आहे
– माझ्या मुलीच्या लग्नाचाही हिशोब करीत आहेत. मेहंदी, फुलवाले, नेलपॉलिशवाले अशा सर्वांकडे जात आहेत.
– गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. २ वर्षे एफआयआर झाला नाही
– राज्याचे माजी वनमंत्री जे भाजपचे आहेत त्यांच्या कन्येच्या लग्नात जंगलाचा देखावा होता. तेथील कार्पेट ९ कोटी रुपयांचे होते त्याचे काय
– मला तुरुंगात टाका. मी थेट सांगतो पाहून घ्या.
– हरियाणात एक दूधवाला ५ वर्षात ७ हजार कोटी रुपयांचा मालक झाला. कसा. ईडी का नाही तपास करीत आहे. कुणाचे पैसे त्याच्याकडे आहेत.
– ७ हजार कोटीतील साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले आहेत.
– राकेश वाधवानने भाजपला २० कोटी रुपये पक्ष देणगी दिली आहे.
– निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची. ती आहे नील किरीट सोमय्याची. आणि हाच नील राकेश वाधवानचा पार्टनर आहे.
– पीएमसी घोटाळ्यातील राकेश वाधवानचा सोमय्याशी थेट आर्थिक संबंध आहे
– वाधवानला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. सोमय्याच्या फ्रंटमॅन देवेंद्र लधानीच्या नावे वसईत साडेचार कोटी रुपयांची जमीन वाधवान कडून घेतली.
– निकॉन फेज १ आणि निकॉन फेज २ या बिल्डींग बांधल्या जात आहेत. मी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी या प्रकल्पांमध्ये लक्ष घालावं. पर्यावरण परवानगी या प्रकल्पांना नाही.
– हे सर्व प्रकरणी मी ईडीच्या कार्यालयात तीनदा पाठवले पण त्याची दखल घेतली नाही.
– भाजप नेते हे ईडीचे वसुली एजंट आहेत. ईडी अत्यंत भ्रष्टाचारी आहे
– ईडीवाल्यांनो हिंमत असेल तर माझ्या घरी या
– ईडीवाल्यांनो, जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे.
– ईडीच्या नावाने मुंबईतील बिल्डर्सकडून वसुली सुरू आहे.
– मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहीले आहे. तक्रार केली.
– मुंबईतील ६० बिल्डर्सकडून १५० कोटी रुपये वसूल केले आहेत. यात ईडीचे लोक सहभागी आहेत
– या सर्वांचे प्रकरण जाहीर करणार
– महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठा कट केंद्राकडून सुरू आहे.
– महाराष्ट्र, बंगाल येथील सरकार पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे
– तुम्ही अद्याप डीएनए पाहिलेला नाही. अजून असे जेल तयार नाही झाले
– अलिबागमधून एका ज्येष्ठ नागरिकाला उचलून नेले. त्याचा छळ केला.
– मोदी, शहांना निवेदन आहे की, हीच तुमची लोकशाही आहे का. सर्वसामान्यांचा तुम्ही छळ करताय
– मी मध्यरात्री शहांना फोन केला आणि सांगितले की, तुम्हा मला टार्गेट करा. पण, निष्पापांना छळू नका.
– आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही
– २०२४मध्ये देशात परिवर्तन होईल
– आज मी फक्त ट्रेलर आणला आहे. पुढील काळात मी आणखी काय काय घेऊन येतोय ते बघाच
– माझे जीवन संघर्षात गेले आहे.
– देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे रोहित कंबोज. पीएमसी बँकेचा पैसा पत्राचार मध्ये लागला. कंबोजचा एक मोठा बांधकाम प्रकल्प आहे. त्यात पीएमसी बँकेचे पैसे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – आरपीआयचे नेते प्रशांत जाधव यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

Next Post

तुम्ही LICचे विमाधारक किंवा एजंट आहात? IPO घेण्यापूर्वी हे वाचाच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
lic ipo

तुम्ही LICचे विमाधारक किंवा एजंट आहात? IPO घेण्यापूर्वी हे वाचाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011