नाशिक – सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याच्या घटनेने संपूर्ण सिडको परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत जाधव यांच्या उजव्या पायाच्या माडीवर दोन गोळ्या शिरल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री घरी जात असताना उपेंद्रनागर येथे यांच्या घराजवळच साडेअकरा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्या नंतर हल्लेखोर यांनी पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडी मध्ये गोळी घुसली. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या कल्पतरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती ती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.