India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संजय राऊत दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? न्यायालयाने दिला हा निकाल

India Darpan by India Darpan
October 4, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्रा चाळ प्रकरणाच्या तपासाच्या तडाख्याला सामोरे जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा मिळताना दिसत नाही. त्यांच्या कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. याशिवाय या प्रकरणातील अन्य संबंधितांचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी, या प्रकरणाची १९ सप्टेंबर रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (पीएमएलए) विशेष न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यादरम्यान राऊत यांच्या कोठडीची मुदत १४ दिवस वाढवण्यात आली होती. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तपास यंत्रणेने राऊतला १ ऑगस्ट रोजी अटक केली होती. यापूर्वी २८ जून रोजीही त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ऑगस्टमध्ये राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याही चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर झाल्या होत्या.

राऊत यांच्या निवासस्थानी छापेमारी दरम्यान ११.५० लाख रुपये जप्त करण्यात आले. यानंतर काही वेळातच त्यांना घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. या वर्षी एप्रिलमध्येही ईडीने ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर दादरमध्ये एक फ्लॅट आणि अलिबागजवळ आठ जमिनीचा समावेश आहे. या जमिनीत स्वप्ना पाटकर यांचाही हिस्सा आहे.

Shivsena MP Sanjay Raut Dasara Melava
ED Custody


Previous Post

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे अभियान आहे तरी काय?

Next Post

आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही रिलायन्सचा गागाट; अमेरिकन कंपनीशी केली हातमिळवणी

Next Post

आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही रिलायन्सचा गागाट; अमेरिकन कंपनीशी केली हातमिळवणी

ताज्या बातम्या

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group