मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? कोण आहेत ते?

by Gautam Sancheti
ऑगस्ट 24, 2022 | 5:24 am
in संमिश्र वार्ता
0
sanjay raut5 e1659349042580

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक हीआहेत. संजय राऊत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र सध्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर सामनातील त्यांचे लेख कोण लिहितो याच्या मागे देखील ईडी लागली होती. राऊत जेलमध्ये असले तरी त्यांचे लेख कसे छापून येतात? तुरुंगातून ते कसे पाठवू शकतात याचे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नात ईडी असताना एक महत्वाची माहिती हाती आली आहे. संजय राऊतांचे साप्ताहिक लेख आता कडकनाथ मुंबईकर लिहित आहे. हा कडकनाथ मुंबईकर कोण? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राऊत हे १९९३ मध्ये कार्यकारी संपादक पदी रुजू झाले. ते एक उत्तम पत्रकार आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी जणांनी केला आहे. राजकीय पत्रकार ते संपादक असा प्रवास केलेले अनेक संपादक आहेत. पण क्राईम रिपोर्टींगपासून सुरूवात करणारे खूप कमी पत्रकार संपादक झालेले आहेत. तसेच ते कुठेही असले तरी तिथून ते अग्रलेख पाठवत असत. सामनाची ताकद त्यांच्या मथळ्यांमध्ये आहे, असे ते म्हणत.राऊत तुरुंगात गेल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सामनाची धुरा हाती घेतली आहे. गेल्याच आठवड्यातील सामनातील संजय राऊतांचा लेख हा कडकनाथ मुंबईकर या नावाने लिहून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण कडकनाथ मुंबईकर हे नाव सर्वांनाच नवखे होते. आता हा नवा गृहस्थ कोण अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबतचे वृत्त काही दैनिकांनी दिले आहे.

सामना’मधले अग्रलेख हे नेहमी चर्चेचा विषय असतात. त्यामधली भाषाशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीशी मिळतीजुळती आहे. बाळासाहेब नसतानाही त्याच पद्धतीचं लेखन सामनामध्ये होत असल्याचं अनेकांना आश्चर्य वाटत असे. बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी आणि त्याचवेळा बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली होती. ती राऊत यांनी तंतोतंत आत्मसात केली. राऊत त्यांच्या शैलीशी इतके एकरूप झाले, की बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात असा प्रश्न वाचकांना पडायचा.

सामनातील अग्रलेखांप्रमाणे संजय राऊत हे रविवारच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक हे सदर लिहित असत तसेच गुरुवारी सच्चाई हे सदर येत असे त्याशिवाय काही वर्षांपूर्वी चेकमेट हे त्यांचे सदर देखील चांगलेच गाजले होते सध्या सामनामध्ये अचानक कडकनाथ मुंबईकर कोण आला, हे पाहण्यासाठी सामनाच्या कार्यालयात विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा करण्यास किंवा माहिती देण्यास नकार दिला. हा उद्धव ठाकरेंचा विशेषाधिकार आहे, असे ते म्हणाले. मात्र, सूत्रांनुसार कडकनाथ मुंबईकर हे नाव साप्ताहिक कॉलमसाठी वापरण्यात आलेले एक पात्र आहे.

राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. राऊत दर रविवारी ‘रोखठोक’ हे सदर लिहितात. तसेच यापूर्वी त्यांचे सच्चाई हे सदर आणि चेकमेट हे सदर देखील चांगलेच गाजले होते. राऊत यांना कोठडीत संपादकीय किंवा लेख लिहिण्याची परवानगी नाही. तसेच या लेखामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राऊतांच्या अटकेनंतरची विधाने, घटनांचा संदर्भ होता. यामुळे हे लेख कोण लिहितोय, याची चौकशी ईडी करत आहे.

कोठडीत असताना राऊत यांनी स्वत: कॉलम लिहिला की, कुणाला तपशील दिला की, सामनाच्या कर्मचार्‍यांनी राऊत यांच्या नावाने लिहीले? त्यामुळेच रविवारच्या ‘कडकनाथ मुंबईकर’च्या बायलाईनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती. त्यांच्या कामामुळे अर्थातच बाळासाहेबांना ते आवडायचे. आपल्या कामामुळे ते बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते. त्यांनी त्यांची भाषा अवगत केली होती. त्यामुळे त्या शैलीत ते अजूनही लिहितात. तीच शैली शिवसैनिकांच्या परिचयाची आहे. तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुला घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखत दिलेली गाजल्या होत्या. त्याचप्रमाणे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण धोरणाचा देखील त्यांनी आपल्या अग्रलेखातून वेळोवेळी पाठींबा देत पुरस्कार केला होता.

Shivsena Mouth Piece Saamana Sanjay Raut Kadaknath Mumbaikar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर ‘त्या’ प्रकरणानंतर आर्यन खान पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय

Next Post

पंतप्रधान मोदींनी सहकारी केंद्रीय मंत्र्यांकडे मागितला हा अनोखा हिशोब? आता काय होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
modi cabinet meet

पंतप्रधान मोदींनी सहकारी केंद्रीय मंत्र्यांकडे मागितला हा अनोखा हिशोब? आता काय होणार?

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011