नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि नगरसेविका हर्षा बडगुजर यांचे चिरंजीव मयुरेश यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला. त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रसीमध्ये झालेल्या या शाही समारंभाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यामुळे हा सोहळा लक्षणीय ठरला.
महापालिकेच्या सिडको विभागाच्या माजी सभापती हर्षा बडगुजर आणि शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे द्वितीय सुपूत्र चि. मयुरेश आणि चि. सौ. कां. मोनिका यांचा शुभविवाह आज संपन्न झाला. मयुरेश यांचे शिक्षण एमटेक (स्ट्रक्चरल) झाले आहे. तर, चिसौका मोनिका या नाशिकरोड येथील श्री राजेंद्र रतन जाधव आणि सौ जिठा राजेंद्र जाधव यांच्या कन्या आहेत. त्या सुद्धा बीई (सिव्हिल) झालेल्या आहेत. या विवाह सोहळ्याला शिवसेना खासदार संजय राऊत, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. तर, राजकीय, सामाजिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती. भव्य मंडप, डेकोरेशन, रोषणाई, शाही पंगत अशा विविध कारणांमुळे हा विवाह सोहळा संपन्न झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटातील काही नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सायंकाळपर्यंत कुणीही हजेरी लावली नव्हती.
Shivsena Leader Sudhakar Badgujar Son Wedding Ceremony