त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी आज पदभार स्वीकारला. त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयामध्ये पदभार स्वीकारणे कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त नगर परिषद कार्यालय आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. यावेळी श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्र्टीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरीजी महाराज, श्रीमहंत सहजानंदगिरीजी महाराज, श्रीमहंत अजयपुरीजी महाराज, श्रीमहंत पिनाकेश्वरगिरी महाराज, श्रीमहंत भगवतगिरी महाराज, श्रीमहंत महेंद्रगिरी महाराज, श्रीमहंत निलकंठगिरी महाराज, श्रीमहंत परमानंद भारती, श्रीमहंत लाभगिरीजी महाराज, श्रीमहंत दत्तगिरी महाराज, साध्वी शारदानंदगिरी महाराज, साध्वी कृष्णानंदगिरी महाराज, साध्वी रेणुकागिरी महाराज, साध्वी अलकनंदागिरी महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव, भाजपा ज्येष्ठ नेते अॅड. श्रीकांत गायधनी, दिलीप जोशी, नगरसेवक कैलास चोथे, सागर उजे, अशोक घागरे, शिल्पा रामायणे, माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनवणे, प्रभुणे, कमलेश जोशी, योगेश दिघे, युवराज कोठुळे, परशुराम पवार, भाजप महिला पदाधिकारी यांचेसह नातेवाईक, मित्र परिवार, स्नेहीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित साधुमहंतांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सागर उजे यांनी केले. यावेळी साधुमहंतांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी उपाध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या कडे पदभार सोपवला. यावेळी युवराज कोठूळे, अॅड. श्रीकांत गायधनी, उमेश सोनवणे, दिलीप जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी केले. त्रिवेणी तुंगार यांच्यावर कौतुकाचा व सत्काराचा वर्षाव झाला. सत्काराला उत्तर देतांना प्रभारी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार म्हणाल्या की, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयन्तशील राहणार आहे. शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येईल तसेच त्र्यंबकेश्वर दर्शनाकरिता व निवृत्तीनाथ यात्रेकरीता येणार्या भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यात येतील. शहरात जी विकासकामे चालू आहे ती चांगल्या दर्जाची होण्यासाठी आपण लक्ष घालणार आहे. कुठल्याही प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. यानंतर प्रभारी नगराध्यक्षा तुंगार यांची शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आदी राष्ट्रपुरूषांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.