इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण? असा प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे युवानते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा!
स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत! अश्या निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये! असेही त्यांनी सांगितले.