इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंजाब राज्यातील मोगा परिसरात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शिवसैनिकाला श्रध्दांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, शिवसेना पक्षाचे एक समर्पित आणि देशभक्त जिल्हाध्यक्ष आणि हिंदुत्वाचे कष्टकरी कार्यकर्ते स्वर्गीय मंगतराम यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.शिवसेना दिवंगत मंगतरामजींच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने, मी स्वर्गीय मंगतराम यांच्या कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये खलिस्तानी विचारसरणीच्या लोकांनी शिवसैनिकाची उघड हत्या केल्याने तेथील आप सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती उघडकीस आली आहे. आम्ही पंजाबच्या आप सरकारचा तीव्र निषेध करतो. हत्येच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी.