शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण रामदास आठवले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांनी याअगोदर निवडणूक लढवली आहे. पण, त्यात त्यांना यश मिळाले नाही. या निवडणुकीनंतर ते शिर्डीला आले की साईबाबांचे दर्शन नेहमी घेतात. आजही त्यांनी दर्शन घेतले.