बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिर्डी विमानतळावर अशी राहणार कोरोना नियमावली

by India Darpan
डिसेंबर 3, 2021 | 4:00 pm
in स्थानिक बातम्या
0
shirdi airport

शिर्डी  – भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटक मध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अन्वये कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळ संचालकांना आदेश जारी केले आहेत. शिर्डी विमानतळावर जगभरातून भाविक श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तेव्हा नवीन व्हेरिएंट च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. यासाठी कोपरगांव व राहाता पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, काकडी व कोऱ्हाळे येथील आरोग्य पथकाची विमानतळावर नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांची नोंद ठेवावी, तपासणी करावी व याबाबतचा अहवाल दररोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोपरगांव तहसीलदार यांना सादर करावा. अशा सूचना ही सदर आदेशात दिल्या आहेत.

विमानतळावर थॅर्मल स्कॅनर, सॅनिटायझर व प्रवाशांना हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी. जंतुनाशकाने विमानतळ प्रवाशी बैठक कक्ष व परिसराची फवारणी करण्याची दक्षता घ्यावी. कोरोना नवीन व्हेरिएंट, कोरोना नियमावली बाबत माहितीपत्रके, ध्वनीक्षेपकांद्वारे सार्वजनिक उद्घोषणा, बॅनर यामाध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शारिरीक अंतर, मुख्यपट्टीचा वापर व हात वारंवार स्वच्छ धुणे हे कोरोना प्रतिबंधात्मक वर्तन प्रवाश्यांना बंधनकारक करण्यात यावे. विमानतळावर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींला क्वारंटाईन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. असे आदेश ही कोपरगांव तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी दिले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘प्राप्तिकर’चे मुंबई, नवी मुंबईत बिल्डरवर छापे; मिळाली १०० कोटींची रोख रक्कम

Next Post

महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये दिली जाणार झायकोव्ह-डी लस; यांना होणार लाभ

India Darpan

Next Post
zycov d vaccine

महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये दिली जाणार झायकोव्ह-डी लस; यांना होणार लाभ

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011