नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुलढाण्याच्या खासदार प्रतापराव जाधव त्यांच्यावर केंद्र सरकारने दखल एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली असल्याने या घडामोडीची मोठी राजकीय चर्चा सध्या सुरु आहे.
केंद्र सरकारकडून नुकतेच संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या रुपाने शिंदे गटाला माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधवांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या या जबाबदारीमुळे प्रतापराव जाधव यांची चर्चा असली तरी काही दिवसांपूर्वी वेगळ्या विषयामुळे ते चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतापराव जाधव यांनी नुकताच सनसनाटी आरोप केला होता. सचिन वाझे १०० कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता, अशा आशयाचं प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या आरोपावरुन एकच खळबळ उडाली होती.
अखेर प्रतापराव जाधव यांनी आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, असंही नंतर स्पष्ट केलं होतं. १०० खोके मातोश्री ओके, असं वक्तव्य केल्यामुळे प्रतापराव जाधवांनी एकच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, प्रतापराव जाधव यांना दिलेली जबाबदारी म्हणजे मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात देण्यात आलेलं पहिलं गिफ्ट असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्षपद होते. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
Shinde Group MP Prataprao Jadhav Modi Govt