गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिंदे गटात पुन्हा नाराजी! आमदार सुहास कांदे आक्रमक; पालकमंत्री दादा भुसेंवर केला हा आरोप

नोव्हेंबर 12, 2022 | 2:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FY7caA X0AMZTwN e1668243436623

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील नांदगावचे आमदार सुहास कांदे हे याच नाराजीतून चर्चेत आले आहेत. यापूर्वी कांदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. आता कांदे यांनी सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये बंड करण्यात आले. या बंडात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्यचे आमदार आणि तत्कालिन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचाही समावेश होता. सुहास कांदे यांचे नाराजीनाट्य महाविकास आघाडी सरकारमध्येही गाजले होते. त्यांनी तत्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करीत थेट उच्च न्यायालयाचा रस्ता धरला होता. भुजबळांकडून पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे ही बाब राज्यभरातच चर्चेची ठरली. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब गेली. त्यानंतर सामोपचाराने या वादावर पडदा टाकण्यात आला. त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झाले. कांदे यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. आता शिंदे-फडणवीस सरकारला राज्यात १०० दिवस होत नाही तोच कांदे यांचे नाराजीनाट्य पुन्हा समोर आले आहे.

कांदे हे आता सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. तशी स्पष्ट माहिती त्यांनी दिली आहे. कांदे सध्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, भुसे हे आमदारांना विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलवत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास असून मरेपर्यंत मी शिंदे गटातच राहणार असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही लवकरच बदल होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहेत.

याप्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सर्व एकदिलाने काम करीत आहोत. कुणीही चुकीचा अर्थ काढू नये, असे भुसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कांदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. भुसे यांनी कालच जिल्हा परिषदेसह ग्रामीण भागातील विविध कामकाजांचा आढावा घेतला. या बैठकीला कांदे अनुपस्थित होते.

Shinde Group MLA Suhas Kande Displeasure
Nashik Nandgaon Shivsena Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे येथील वृध्दाचे अ‍ॅटोरिक्षा प्रवासात पाच लाख रूपये चोरट्यांनी केले लंपास

Next Post

फलज्योतिषीच झाले त्रिफळाचित! …तर भारत का जिंकला नाही?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

फलज्योतिषीच झाले त्रिफळाचित! ...तर भारत का जिंकला नाही?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011