औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत याने एका व्यावसायिकाला धमकी दिल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे गेल्या पाच वर्षांपासून थकलेले बिल मागितले म्हणून सिद्धांत यांनी त्रिशरण गायकवाड या केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियात फिरत आहे.
त्रिशरण गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१७ मध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्या पाठोपाठ एका महिन्यानंतर आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसाची जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्याचेच शिरसाट यांच्याकडे पैसे थकले आहेत. आमदार संजय शिरसाट यांचे एकूण पावणेपाच लाख रुपयांचे बिल झाले होते. मात्र, त्यातले अजून ७५ हजार रुपये थकले होते. त्यांच्या एका शब्दांवर डिस्काऊंट दिला. त्यानंतरही त्यांच्याकडे ४० हजार रुपये राहिले. म्हणून मी सजय शिरसाठ आणि सिद्धांत शिरसाठ यांच्याशी बोललो. आमदार संजय शिरसाठ पैसे देतो असे म्हणाले. सिद्धांत यांनी २० हजार दिले. उर्वरित २० हजार रूपये मागितले. मात्र, हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी दावा केला. मला माझे पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसांकडेही जाणार आहे.
Shinde Group MLA Sanjay Shirsat Son Threat
Politics Aurangabad Catering