मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथा शिंदे यांच्यासोबत एका रॅलीदरम्यान त्यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासंदर्भात खुलासा देत म्हात्रे यांनी ‘तो’ व्हिडिओ मॉर्फ केल्याचे सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने ट्विटरवरून स्वत:ची भूमिका मांडली आहे.
‘राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरून एका स्त्रीसंदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? एखादा पुरुष राजकारणात स्त्रिला कसे वागवतो याचे मला अनुभव आले आहेत. मी माझ्या आत्मसन्मानासाठी माझी जीव आणि करिअर सर्व पणाला लावले. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखे काही नसले की असे प्रकार केले जातात,’ असा आरोप शीतल म्हात्रे यांनी लावला आहे.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1634635605320540160?s=20
पोलिसांत तक्रार
याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ‘मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असे असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोलले जातेय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असे वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया म्हात्रे यांनी दिली.
Shinde Group MLA and Spokesperson Morphed Video Viral
Sheetal Mhatre MLA Prakash Surve