रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिंदे गटातील उतावीळ मंत्र्यांवर फडणवीसांची तीव्र नाराजी; परस्पर घोषणा न करण्याची तंबी

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 3:35 pm
in संमिश्र वार्ता
0
CM DCM Shinde Fadanvis press e1657865706678

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिंदे गटामध्ये काही वाचाळवीर आणि प्रसिद्धीसाठी काही मंत्री आसूसलेले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आले. याची त्यांनी गंभीर दखल घेतली असून या मंत्र्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काही मंत्री परस्पर नवनव्या घोषणा करत आहेत. या घोषणा कायद्याच्या कसोटीवर टिकण्याबरोबरच आर्थिक बोजाचा प्रश्नही समोर आल्याने अनेक विभागांनी संबंधित मंत्र्यांच्या घोषणांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या. मंत्र्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सरकारची कोंडी होत असून, पुढील काळात त्याचा अधिक त्रास होण्याची भीती असल्याने शिंदे- फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच अशा उतावीळ मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय शक्यतो मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जाहीर करतात. मात्र काही मंत्र्यांना निर्णय जाहीर करण्याची खूपच घाई झालेली दिसते. नुसती चर्चा झाली तरी निर्णय झाल्याचे ते बाहेर जाहीर करतात. यामुळे समज गैरसमज निर्माण होतात, तसेच ज्यांचे संभ्रम देखील निर्माण होतात. नवे सरकार स्थापन झाल्यापासून मनमानीपणे सवंग लोकप्रिय घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फटकारले. कोणताही सारासार विचार न करता घोषणा करू नका, कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, असे फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना सुनावले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिली. त्यामुळे प्रसिद्धीबाज मंत्र्यांची चांगलीच कानकोंडी झाली.

सध्या काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढू लागल्या असल्या तरी त्याची पूर्तता करताना सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्राच्या योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये विचारमंथन सुरू आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही ‘गोपनीय बातमी’ प्रसारमाध्यमांमध्ये फुटली.

याबाबत नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, अशी थेट विचारणाच फडणवीस यांनी सत्तार यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही सत्तार यांना खडसावले. त्यावर आपण निर्णय झाल्याचे म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचे सांगितले, अशी सारवासारव सत्तार यांनी केली. मात्र, त्याने कोणाचेही समाधान झाले नाही. कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत.

कोणतीही नवी योजना किंवा निर्णय घेताना त्याबाबत मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केवळ विचार सुरू असताना घोषणा केल्यास त्या विषयाचे, निर्णयाचे महत्त्व निघून जाते. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका, असा इशाराच फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य मंत्रीही शिंदे-फडणवीस यांच्या आक्रमक भुमिकेमुळे चांगलेच चपापले होते.

Shinde Group Ministers BJP DYCM Devendra Fadanvis
Maharashtra Government Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवरुन उच्च न्यायालय संतप्त; राज्य सरकारला दिले हे आदेश

Next Post

‘झी मराठी’च्या मालिकेवर अभिनेता आस्ताद काळे याने दिली ही प्रतिक्रीया

Next Post
Astad Kale

'झी मराठी'च्या मालिकेवर अभिनेता आस्ताद काळे याने दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011