India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे गटातील या नेत्यामागील ईडीचा ससेमिरा थांबणार; …म्हणे गैरसमजातून झाली तक्रार

India Darpan by India Darpan
September 17, 2022
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल करण्यात असल्याची माहिती विशेष पीएमएलए न्यायालयाला टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या‘सी-समरी’ अहवालावर आक्षेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा आता थांबेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एम. एस. बडे यांनी १४ सप्टेंबर रोजी मूळ गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला होता. म्हणजेच पोलीस या गुन्ह्याचा तपास दफ्तरबंद करू शकतात. तसेच न्यायालयाने ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हादेखील रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलएअंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. या सगळ्यानंतर आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशीधरन यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे. ईडीने शशीधरन यांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे. सरनाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत.

अमित चांदोले यांनीही न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याची व ईडीने मागितलेली रिमांड फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. तथापि, विशेष न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी चांदोले यांची न्यायालयीन कोठडी वाढविणे योग्य असल्याचे म्हणत पुढील सुनावणी २१ सप्टेंबरला ठेवली आहे.

Shinde Group Leader ED Enquiry Will Stop soon
Pratap Sarnaik


Previous Post

तब्बल ७० वर्षांनी चित्ते भारतात दाखल; नामिबियाहून आणले, मोदींनी ८ चित्ते अभयारण्यात सोडले (व्हिडिओ)

Next Post

राज्यातील चालकांना प्रशिक्षित करण्यासाठी नाशिक येथे होणार विशेष प्रशिक्षण केंद्र

Next Post
प्रातिनिधीक फोटो

राज्यातील चालकांना प्रशिक्षित करण्यासाठी नाशिक येथे होणार विशेष प्रशिक्षण केंद्र

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group