मुंबई – अश्लिल चित्रपट बनविण्याच्या आरोपांखाली उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो कोठडीत आहे. अखेर यासंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मौन सोडले आहे. अटकसत्रानंतर प्रथमच तिने सोशल मिडियात पोस्ट टाकून तिने तिचे मत व्यक्त केले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक पोस्ट टाकली आहे. त्यात तिने एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, जिवंत राहणे आणि संकटांना तोंड देण्याबाबत यात विचार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रसिद्ध लेखक जेम्स थर्बर यांचा एक सुविचार त्यात नमूद करण्यात आला आहे. थर्बर म्हणतात की, मी जिवंत आहे आणि भाग्यशाली आहे हे समजून मी दीर्घ श्वास घेते. यापूर्वीही मी अनेक संकटांना तोंड दिले आहे. यापुढेही भविष्यात आव्हानांना सामोरे जाईन व सुरक्षित राहिन. आज मला हे आयुष्य जगण्यापासून किंवा संकटांपासून कुणीही विचलीत करु शकत नाही.
दरम्यान, राज कुंद्रा हे पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याने राज यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिल्पाने शेअर केलेली पोस्ट अशी