घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखोचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या 20 ते 25 डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -2024 हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणी चा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला..
या प्रदर्शनात अगदी 10 लाखापासून 5 कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन,औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर,बांधकाम साहित्य , नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान ,सुरक्षा साहित्य ,गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिकाचे कोणत्याही शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचे स्थान असते.यासोबतच शहराचे अर्थकारण व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाणत दिला जातो. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे नमूद करून कृणाल पाटील म्हणाले की नाशिक शहर हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.कृषी,आरोग्य ,शिक्षण ,उद्योग, ,कृषीपूरक व्यवसाय ,निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.त्यामुळे अश्या बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात अवश्य गुंतवणूक करावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले की, या प्रदर्शनाचे औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचे ब्रॅन्डींग करत असते.यामध्ये नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती अनेकांना दिली जाते.या मुळे जगभरातील अनेकांचा ओघ नाशिक कडे असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. गौरव ठक्कर यांनी शेल्टर 2024 मधील खास आकर्षणाची माहिती दिली. ती आकर्षणे अशी –
- 100 हून अधिक विकसकांचे 500 हून अधिक पर्याय
- दररोज दर 3 तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे. आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही.एस दुचाकी
3.सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ ,नो जीएसटी व अन्य
4.लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया
5.भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन - मोफत पार्किंगची सुविधा. तसेच मोफत व्हॅले पार्किंग उपलब्ध
- आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट
- सुसज्ज फूड कोर्ट
या प्रसंगी उपस्थित शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवरील मार्गदर्शक सेमिनार चे देखील आयोजन करण्यात आले असून रोज संध्यकाळी करमणुकीचे कार्यक्रम देखील प्रदर्शन स्थळी असतील . क्रेडाई नाशिक मेट्रो चे सदस्य म्हणजे विश्वसनीयता असे समीकरण गेल्या अनेक वर्षात प्रस्थापित झाले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले .
तिसरी पिढी बांधकाम व्यवसायात –
पारंपारिक बांधकाम ते आजचे बांधकाम यामध्ये तंत्रज्ञान ,ग्राहकांच्या आवडीनिवडी,गरजा यात आमूलाग्र बदल झाला आहे.कधीकाळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आज उंच इमारतींचे तसेच टाऊनशिपचे शहर म्हणून ओळखले जात आहे.शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांची तिसरी पिढी, अनेक नव उद्योजक या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन तसेच नाशिक बाहेरील अनेक अग्रणी बांधकाम व्यवसायिक नाशिककरांच्या सेवेत कार्यरत आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावारूपाला येण्यासाठी जितुभाई ठक्कर,अनंत राजेगावकर , सुरेश अण्णा पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार,सुनील कोतवाल,उमेश वानखेडे,रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे. भूमिपूजनाचे स्वागत व आभार सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी मानले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, ऋशिकेश कोते, मनोज खिंवसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.