India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकला १४ व १५ जानेवारी रोजी शेकोटी संमेलन; साहित्‍यिक आणि लोककलांचा भरगच्‍च कार्यक्रम

India Darpan by India Darpan
January 11, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गिरणा गौरव प्रतिष्‍ठान, नाशिक यांच्‍या वतीने नाशिकमध्‍ये येत्‍या १४ व १५ जानेवारी रोजी, अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्‍य संमेलन, २०२३ चे आयोजन करण्‍यात आले असून कमलाकर (आबा) देसले साहित्‍य नगरी, भावबंधन मंगल कार्यालय, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक येथे पार पडत असलेल्‍या या संमेलनात साहित्‍य रसिकांसाठी तसेच लोककलेच्‍या आस्‍वादकासांठी भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. थंडीचा पारा घसरत असतांनाच्‍या या नेमक्‍या कालावधीत होत असलेले हे शेकोटी संमेलन साहित्‍य आणि लोककलेची आवड असलेल्‍या नाशिककरांसाठी एक मोठी मेजवानी ठरण्‍याची अपेक्षा आहे. ‘साहित्‍य ज्ञानाचे आगर, करू लोककलेचा जागर’ हा या संमेलनाच्‍या आयोजनामागचा मुख्‍य हेतू आहे.

ज्‍येष्‍ठ समीक्षक डॉ.शंकर बोराडे यांची या संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली असून ज्‍येष्‍ठ लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांच्‍या हस्‍ते या संमेलनाचे उद्घाटन करण्‍यात येईल. गझल कट्टा, शेकोटी कवी संमेलन, कथाकथन, अहिराणी कवी संमेलन, बालकवी संमेलन, महिला परिसंवाद आणि आमत्रितांचे कवी संमेलन हे साहित्‍य क्षेञाशी निगडीत असलेले नित्‍याचे कार्यक्रम या संमेलनात तर होणार आहेतच. परंतु, त्‍याचबरोबर महाराष्‍ट्राची लोकधारा, धिंडवाळी गाणे, ढाक वाद्य, पावरी नृत्‍य, जागरण गोंधळ, तळी भरणे इ. लोककलांवर आधारीत आगळे वेगळे कार्यक्रम, हे या संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहेत. याखेरीज काही साहित्‍यिक तसेच लोककलावंत यांना विविध पुरस्‍कार देवून या संमेलनात सन्‍मानित देखील करण्‍यात येणार आहे.


Previous Post

अधिकाऱ्यांमध्येच जुंपली! IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवित असल्याचा आयुक्त पुजा मीनांचा गंभीर आरोप; प्रशासनात खळबळ

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हे लक्षात घ्याच

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - हे लक्षात घ्याच

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group