शेगाव – येत्या गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू होत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील गजानन महाराज संस्थाननेही बैठक घेऊन विविध निर्णय घेतले आहेत. येत्या ७ ऑक्टोबरपासून मंदिर दर्शनासाठी उघडले जाणार आहे. मात्र, ज्या भाविकांकडे ई पास असेल त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. ई पास देण्याची व्यवस्था संस्थानकडून केली जाणार आहे. एका दिवसात केवळ ९ हजार भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्याचेही संस्थानने निश्चित केले आहे. तसेच, १० वर्षाच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील भाविक यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या नियमांचे कसोसीने पालन करावे लागले. ज्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना मंदिर प्रवेशासाठी प्राधान्य असणार आहे.