इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शार्क टँक इंडिया शो काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा शो आता शेवटच्या टप्प्यात असल्याने, शोच्या चाहत्यांना अवघे काही नावीन्यपूर्ण उत्पादने पाहण्याची संधी उरली आहे. या शोमध्ये स्वयंपाकाचा वेळ वाचण्यासाठी एका उद्योजकाने विकसित केलेले तंत्र सादर करण्यात आले. अवघ्या सात मिनिटात त्याने चिकन बनवून दाखवल्याने जजेसदेखील अचंबित झाले.
नुकताच सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवर या खेळाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका उद्योजकाने क्विक कुकिंग प्रॉडक्ट आणले आहे. उद्योजकीय स्वयंपाक तंत्र ७० टक्क्यांपर्यंत स्वयंपाकातील वेळ आणि ५० टक्के उर्जेची बचत करतात. या उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवत, तंत्र समजावून सांगण्याबरोबरच त्यांनी ‘शार्क’साठी चिकनही शिजवले. अवघ्या सात मिनिटांत त्या उद्योजकाने स्वादिष्ट चिकन तयार केले. उद्योजकाच्या या तंत्राने जजेस आनंदीत झाले. परंतु जजेसला त्याचे कार्य तितकेसे प्रभावी वाटले नाही. जज विनिता सिंग यांनी या व्यवसायात गुंतवणूक करण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, जी कंपनी महसूलपूर्व टप्प्यात आहे त्यात मी गुंतवणूक करू शकणार नाहीत.
अनुपम मित्तल यांनी त्यांच्या व्यवसायाच्या खर्चाविषयी बिझिनेस मॉडेल सादर करणाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले, परंतु एकाही शार्कला त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक वाटले नाही. उद्योजकाने हेदेखील सांगितले की, या व्यवसायासाठी त्याच्याकडे गुंतवणूकदारही आहेत. त्यावर शार्कने त्याला विचारले की आतापर्यंत कोणी गुंतवणूक केली आहे का? या प्रश्नाचे उत्तरही जजेसला समाधानकारक वाटले नाही. नमिता थापर यांनी हे उत्पादन वापरणार नसल्याचे सांगत गुंतवणूक करण्यास नकार दिला. त्यांनी उद्योजकाला हे प्रॉडक्ट आधी विका आणि नंतर पुढील सिझनमध्ये या, असा सल्ला दिला. कोणत्याही शार्कला त्याची व्यावसायिक कल्पना समजली नाही. त्यामुळे त्याला कोणतीही गुंतवणूक मिळू शकली नाही. हा शो नुकताच भारतात आणण्यात आला आहे. शार्क टँक इंडिया शो अमेरिकन शोपासून प्रेरित आहे. हा शो २००९पासून अमेरिकेत सुरू आहे. अमेरिकेत या शोचे १३ सीझन झाले आहेत. हा शो आधी स्क्रिप्टेड असल्याचं सांगण्यात येत होतं. ज्यावर शोचे जज अनुपम मित्तल यांनी स्वतः सांगितले की, हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही.