लखनऊ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि अत्यंत अभ्यासू पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विशेष म्हणजे, काल रात्रीपर्यंत त्यांनी टिव्हीवर वार्तांकन केले. सध्या उत्तर प्रदेशची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. यासंदर्भात ते अतिशय अचूक वार्तांकन करीत होते. कमाल खान यांच्या वृत्तांकनाची प्रेक्षक वाट पहायचे. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि निवेदनाची उत्कृष्ट शैली यामुळे ते ख्यात होते. त्यांच्या पत्नी रुची कुमार या सुद्धा पत्रकार आहेत.
https://twitter.com/ndtv/status/1481850722019057667?s=20
कमाल खान यांना सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात ख्यातनाम रामनाथ गोयंका पुरस्काराचाही समावेश आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात वार्तांकन कसे करावे याचा मापदंड त्यांनी घालून दिला होता. त्यामुळेच त्यांचे वार्तांकन सर्वाधिक पाहिले जायचे. राजकारण, समाजकारण, विकास या विषयावरील त्यांचे वृत्त खुप चर्चिले जायचे. विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.