नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि त्यांना इतर सेवा देण्यासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत ‘राष्ट्रीय हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही हेल्पलाईन कार्यन्वित झाली आहे. हा राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरीकांना कोणतीही वृद्ध व्यक्ती बेघर असल्याचे आढळल्यास अथवा ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/robmhgoa/status/1501468498131767299?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष टोल फ्री हेल्पलाईन कार्यन्वित केली आहे. याद्वारे ज्येष्ठांना विविध प्रकारची मदत मिळत आहे. एल्डरलाइन प्रकल्पांतर्गत प्रमुख राज्यांमध्ये सुरू केलेल्या कॉल सेंटरच्या (टोल फ्री क्रमांक – 14567) ला मोठे यश मिळत आहे. कोविड महामारीच्या काळात या हेल्पलाइनने विलक्षण कार्य केले आहे. उदा. कसगंज जिल्ह्यात, ७० वर्षांच्या उपाशी, निराधार, ज्येष्ठ महिलेला या हेल्पलाइनच्या माध्यमातून वृद्धाश्रम उपलब्ध करून देण्यात आले. `एल्डरलाइन`ने ७० वर्षांच्या माजी सैनिकाला मदत केली, जे आपल्या घरी पोहोचण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चांदौसी बस स्थानकात अडकून राहिले होते. `एल्डरलाइन` हे हजारे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करीत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सरकारने त्यांच्यासाठी `नियर होम` (घराजवळ) लसीकरण केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.