लखनऊ (उत्तर प्रदेश) – मंत्रालयातील उपसचिव महिला कर्मचाऱ्याशी अश्लिल हरकत होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिला कर्मचाऱ्याने या उपसचिवाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. आपल्या हातातील मोबाईल हेच अस्त्र समजून तिने उपसचिवाच्या अश्लिल हरकतींचा व्हिडिओचा काढला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेत लखनऊ पोलिसांनी उपसचिव इच्छाराम यादव याला जेरबंद केले आहे. महिला कर्मचाऱ्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून यानिमित्ताने सरकारी कार्यालयातील महिला असुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/aditytiwarilive/status/1458469215720013825