इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारचे नाव घेतले की कुठल्याही क्षुल्लक कारणांवरून बंदूक काढणारे गुंडच डोळ्यापुढे येतात. क्षुल्लक कारणांवरून मारापिटी करणे तर अत्यंत कॉमन बाब आहे. याची प्रचिती बिहारमधल्या घटनांकडे बघितल्यावर येते. पण सध्या बिहारमधील दोन महिला शिक्षकांमध्ये झालेली फ्री स्टाईल सर्वाधिक चर्चेत आहे. येथील पुरुषांसोबत महिलाही मारापिटी करण्यात कुठे कमी नाहीत, हेच सिद्ध करणारी ही घटना आहे.
पाटणा जिल्ह्यातील बिहटा ब्लॉकमधील कौडिया पंचायतीच्या माध्यमिक शाळेतील ही घटना आहे. येथील दोन महिला शिक्षकांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. रोज काहीतरी निमित्त निघून त्यांची भांडणं व्हायची. अश्यात काल भांडण विकोपाला गेले आणि दोघी एकमेकींना मारहाण करू लागल्या. सुरुवातीला सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लवकरच भांडण आटोक्यात येईल असे वाटले होते.
शाळेच्या इमारतीपासून ही मारापिटी सुरू झाली होती. ती बघता बघता गावातील एका शेतापर्यंत पोहोचली. दोघीही एकमेकींना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारत आहेत. एवढेच नव्हे तर झिंज्याही उपटत आहेत. दोन माणसं भांडतात तसे ते हे भांडण सुरू होते. गावकऱ्यांसाठी हे एका दृष्टीने मनोरंजन होते आणि तसे बघितले तर वाईटही होते. त्यामुळे अनेक लोक त्यांना सोडवायला गेले. पण त्यांनाही मारच खावा लागला. कारण
मारापिटीत तल्लीन
दोघीही एकमेकींना मारण्यात इतक्या तल्लीन झाल्या होत्या की, त्यांना आपण शाळेतून निघून शेतापर्यंत येऊन पोहोचलोय, याचे भानच नव्हते. विशेष म्हणजे त्यात एकीच्या मैत्रीणीने भांडणात एन्ट्री घेतली आणि तिनेही आपल्या मैत्रीणीच्या बचावासाठी पहिलीला मारायला सुरुवात केली. तिने तर चक्क पायातली चप्पल काढून सपासप मारायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजुंनी तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मुलांची मजा
शाळेतल्या शिक्षकच एकमेकींसोबत भांडत असल्यामुळे मुलांची हिंमत वाढली. त्यात काही उपद्रवी विद्यार्थ्यांनी हीच योग्य संधी आहे, हे ध्यानात घेऊन मोबाईल काढला आणि व्हिडियो शूट केला. या भांडणाचे व्हिडियो बघता बघता काही क्षणात अख्ख्या देशात व्हायरल झाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/TV9Bharatvarsh/status/1661739338428977157?s=20
School Women Teachers Fighting Video Viral