India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

IAS अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम लवकरच महाराष्ट्रात परतणार…. परदेशात घेतली ही डिग्री

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे लवकरच राज्याच्या प्रशासनामध्ये परतणार आहेत. त्यांनी नुकतीच हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे ते राज्याच्या आरोग्य विभागात दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोशल मिडियात पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्ती. हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. वेळ छान गेला. जगभरात मित्र केलेत. लवकरच कामावर परत… महाराष्ट्र शासनात रुजू होण्यास उत्सुक… आनंदित.

डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या परदेशी शिक्षणाचा महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

IAS Officer Dr Pravin Gedam Harvard Degree


Previous Post

नाशकात सुराणा दाम्पत्याचा आणखी एक कारनामा उघड… अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले… आणखी एक गुन्हा दाखल

Next Post

दे दणादण… पार लाथाबुक्क्यांनी आणि झिंज्या उपटत महिला शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल… व्हिडियो व्हायरल!

Next Post

दे दणादण... पार लाथाबुक्क्यांनी आणि झिंज्या उपटत महिला शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल… व्हिडियो व्हायरल!

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group