India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर; यंदा इतक्या दिवस मिळणार सुटी

India Darpan by India Darpan
October 9, 2022
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत. सध्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार, येत्या २० ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्या लागणार आहेत. ही सुटी ७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.  त्यातच ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे त्यादिवशीही सुटी आहे. परिणामी, ९ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार आहेत. परिणामी, शाळांना तब्बल १८ दिवस सुटी मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांना दिवाळी निमित्त सुटी दिली जाते. यंदा दिवाळीला २१ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. २१ ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे. २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळा बंद राहणार आहेत. कोरोनामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद राहिल्या होत्या. आता कुठे नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे शिक्षकांचे लक्ष असणार आहे.

पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित, अक्षर ओळख व्हावी यासाठी सध्या विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निंबध लिहिणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

School Diwali Holiday Declare Education Dept
Vacation


Previous Post

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; तब्बल १० कोटींची डील झाल्याचे उघड

Next Post

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

Next Post

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group