देशी बियाणांचे लागवड करण्याचे सयाजी शिंदे यांनी केले आवाहन
नाशिक – मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी अन्नाची गरज असते. ते अन्न आपल्याला विविध झाडांच्या माध्यमातून प्राप्त होत असते. सध्या आपल्याकडे विदेशी झाडे लागवड करण्याचे फॅड आले आहे. अर्थाने माती व पर्यावरणाचा विचार करून देशी झाडांच्या बियाणांचे लागवड करत त्यामाध्यमातून तयार होणाऱ्या जिल्हाभरात लागवड करण्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. पळसे साखर कारखाना शाळेच्या आवारात नाशिक जिल्ह्यातील पहिल्या ‘देवराई वृक्ष बँकेची स्थापना अभिनेते शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी विलास गायधनी व त्यांच्या मित्र परिवाराने एकत्र येथे या सह्याद्री देवराई वृक्ष बँकेची स्थापना केली.
या बँकेच्या माध्यमातून बिया उपलब्ध करून जिल्हाभरात देशी वृक्ष लागवडीला चालना देण्यात येणार आहे. यावेळी देवराईच्या संचालिका अलका शिंदे, अमोल जाधव, सचिन चंदनाने, जयंत ठाकूर, केशव कासार, रोहित झंझने, समाधान लभाडे, योगेश पदंरे, अभिनेता डॉ.सुयोग गोर्हे , नाशिक जिल्हा समन्वयक शेखर गायकवाड, वृक्षमित्र तानाजी भोर, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, नवनाथ गायधनी, शोभा गायधनी, विष्णुपंत गायखे, नासाका प्रभारी कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक भिकाजी नाठे, राजेंद्र गायधनी, विलास आगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यवृक्ष आंबा वृक्षाचे पूजन करण्याबरोबर वडाच्या झाडासह रोपण करण्यात येऊन या बँकेची स्थापना करण्यात आली. या वृक्षबँकेच्या माध्यामातून ऑगस्ट महिन्यापर्यंत १ लाख बियांपासून रोपे तयार करत त्याचे जिल्हाभर वाटप करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. प्रास्ताविकातून विलास गायधनी यांनी देशी झाडांचे संगोपन करताना पर्यावरण प्रेमींच्या सहकार्याने निर्धारित वृक्ष बियाणांचे संगोपन करून ते वृक्ष जिल्हाभर लागवड करत वृक्ष बँक स्थापन करण्याचा उद्देश्य साकार करण्यात येईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमास संग्राम करंजकर, दिलीप भागवत, संजय गायधनी, श्रीकांत गायधनी, भास्कर मुंजे, विकास भागवत, आत्माराम दाते, नारायण मुठाळ, रवींद्र गायधनी, आदित्य गायधनी, तुषार गायधनी, सुनील बर्वे, यांसह नासाका शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.