इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मूळची नाशिकची असलेली आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस आई होणार आहे. एक पोस्ट शेअर करुन तिने ही गुडन्यूज दिली आहे. मृणाल सध्या अमेरिकेत असते. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आणि ‘हे मन बावरे’ आदी लोकप्रिय मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका केली आहे.
मृणालने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. त्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. लहान बाळाचे कपडे, डेटी बिअर, बुट, हे दिसते आहे. तसेच, बाळाच्या ड्रेसवर कमिंग सून असेही लिहीलेले आहे. या पोस्टमध्ये मृणाल म्हणते की, “आम्ही ठरवलंय की, आता झोपायचं नाही, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. स्वच्छ घरात राहायचं आहे. आमचा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे”.
मृणालने नीरज मोरे या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाशी लग्न केले. त्यामुळे मृणालही नीरज सोबत अमेरिकेमध्ये आहे. लग्नानंतर तिने सिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. आणि आता ती आई होणार आहे. तिने पोस्ट शेअर करताच विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मृणालने शेअर केलेली पोस्ट अशी