नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा युक्तीवाद आज संपल्यानंतर दुपारनंतर शिंदे गटाचे जेष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला. या युक्तीवादात त्यांनी पक्षात फुट पडली म्हणून आमदारांना अपात्र ठरवा हा प्राथमिक युक्तिवाद होता. राज्यपालांच्या अधिकाराबाबत माझ्याआधी जोरदार युक्तिवाद झाले. त्यात सांगितले की, अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत बहुमत चाचणी नको. पण बोम्मई खटल्याचा विचार करता याच्याविरुद्ध उत्तर आहे. त्यात निर्णय ९ न्यायाधीशआंनी घेतला होता. शिवराज सिंग चौहान केसमध्येही राज्यपालांनी निर्णय घेतला होता.
त्यानंतर त्यांनी या युक्तीवादात बोम्मई केसवर भर दिला. यावेळी ते म्हणाले की, बोम्मई केसमध्ये मुख्यमंत्री बहुमत चाचणीला तयार होते, पण राज्यपालांनी त्याला नकार दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सदनात बहुमत सिद्ध करायला सांगणे हाच योग्य निर्णय होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीआधी राजीनामा दिला असेही त्यांनी सांगितले. बोम्मई आणि चौहान या खटल्यांमध्ये राज्यपालांना फ्लोअर टेस्ट बोलवण्याचा अधिकार असल्याचे कौलु यांनी सांगितले. त्यामुळे राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट सांगितली, मग त्यात काय चुकल असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला. या युक्तीवादात त्यांनी अनेक मुद्दे मांडले.
यावेळी त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावाही कौल यांनी केला. या प्रकरणात केवळ अंतर्गत नाराजीचा विषय आहे, पक्षफुटीचा नाही, आमचा गट म्हणजे खरी शिवसेना आहे. तो निर्णय अर्थातच निवडणूक आयोगाचा आहे असेही कौल यांनी सांगितले.