नाशिक – सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मिराज इंडस्ट्रीच्या कारखान्यात भीषण आग लागली असून सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या ९ बंबांनी घटनास्थळी दाखल होत विझवली.