डांगसौंदाणे– येथील मराठा बटालियनचे जवान दिवंगत विजय बापू सोनवणे यांचा आसाम मधील तेजपुर सेक्टर मध्ये डिसेंम्बर २०१८ मध्ये अकाली मृत्यू झाला होता. डांगसौंदाणे गावचे रहिवाशी असलेल्या जवान विजय सोनवणे यांच्या समूर्ती पित्यार्थ अमर जवान स्मारक व उद्यानाची निर्मिती ग्रामपंचायत डांगसौंदाणेनेनी केली आहे. या उद्यानाचे लोकार्पण खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे आ दिलीप बोरसे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बागलाण पंचायत समितीच्या सभापती इंदूबाई ढुमसे उपसभापती ज्योती आहिरे ,डॉ शेषराव पाटील, बाजार समितीचे सभापती संजय देवरे ,माजी सभापती संजय सोनवणे उपस्थित होते.
डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने स्थानिक विकास निधीतून अमर जवान विजय सोनवणे स्मारकाची निर्मिती करत दिवंगत जवान सोनवणे यांच्या समूर्ती ला उजाळा दिला आहे. या वेळी सैन्य दलातील जवानांनी व मान्यवरांनी स्मारकास पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली या वेळी वीर पत्नी वैशाली सोनवणे, आई , वडील, भाऊ यांच्या हस्ते ही पुष्पचक्र अर्पण करण्यात आले .तर विविध मान्यवरांनी पुष्प चक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी सरपंच जिजाबाई पवार उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, मा सरपंच विजय सोनवणे, वैशाली भदाणे, यशोदा सोणवणे, जाणता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोपान सोनवणे अनंत दिक्षित, राजेंद्र चव्हाण ,दिगंबर भदाणे पंढरीनाथ सोनवणे ,जगदीश सोनवणे, आबाजी सोनवणे, योगेश सोनवणे बुंधाटे चे उपसरपंच नंदू बैरागी, ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी निवृत्त सैनिक संदीप सोनवणे, कैलास आहिरे, शिवा चव्हाण आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.