India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत टिअर २, टिअर ३ शहरे आघाडीवर; महिलांचे प्रमाणही लक्षणीय

India Darpan by India Darpan
August 16, 2021
in वाणिज्य
0
मोठा व्यवहार! टेस्लाने बिटकॉईन मध्ये गुंतवले दीड अब्ज
0
SHARES
228
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई – भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, वझीरएक्सने भारतातील टीअर २ आणि टिअर ३ शहरांमधून यूझर्सच्या साइनअपमध्ये २६४८% वृद्धी अनुभवली. एक्सचेंजमध्ये ७.३ दशलक्षांपेक्षा जास्त यूझर्स असल्याचे आणि २०२१ मध्ये आजपर्यंतचा सर्वाधिक २१.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार झाल्याचे कंपनीने सांगितले.

टिअर २ आणि टिअर ३ शहरांनी २०२१ मध्ये वझीरएक्सवर एकूण साइनअपमधील जवळपास ५५% वाटा उचलला असून त्यामुळे टिअर १ शहरांना मागे टाकले. त्यांनी २३७५% ची साइनअप वाढ दर्शवली. भारतातील प्रमुख ऑनलाइन पेमेंट गेटवे- रॅझॉरपेच्या अहवालानुसार, टिअर २ व टिअर ३ शहरांनी प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये ५४% डिजिटल ट्रान्झॅक्शन दर्शवले. याद्वारे वर्षभरात ९२% वृद्धी नोंदवली.

सतत कमी होत असलेल्या स्मार्टफोनच्या किंमती तसेच स्वस्त व वेगवान इंटरनेटचा प्रवाह यामुळे निम शहरी भाग आणि ग्रामीण भागांमध्ये वेगाने इंटरनेटचा वापर होत आहे. महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनने या भागातील डिजिटलचा स्वीकार आणखी वेगाने झाला. तसेच भारतातील क्रिप्टो स्वीकारण्याचे सर्वाधिक लोकही येथेच आहेत. कारण यामुळे लोक ऑनलाइन उथ्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याचा तसेच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचठिकाणी ते बिटकॉइन सारख्या जागतिक मालमत्तेत प्रवेश करतात, येथे जगाच्या कोणत्याही भागातून गुंतवणूक करता येते.

विशेष म्हणजे, अहमदाबाद, लखनौ, पाटणा यासारख्या टिअर २ शहरांमध्ये २९५०% वाढ झाली तर रांची, इंफाळ, मोहाली यासारख्या टिअर ३ शहरांनी वझीरएक्सवर २४५५५% ची सरासरी वृद्धीची नोंद केली. वझीरएक्सचे सीईओ निश्चल शेट्‌टी म्हणाले, “क्रिप्टोमध्ये ग्रामीण भारतातील आर्थिक समस्या दूर करण्याची आणि भांडवल सहजपणे मिळवणे, जास्त ऑनलाइन नोकऱ्या उपलब्ध करण्याची प्रचंड क्षमता आहे. वझीरएक्स येथे, एक सुरक्षित क्रिप्टो इकोसिस्टिम तयार करणे, जी देशाला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञानवादी अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करत डिजिटल इंडियाची मोहीम पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

दरम्यान, निष्कर्षांमधील सर्वोत्तम घटकांपैकी एक म्हणजे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील महिलांची क्रिप्टोच्या समूहात कशी समाविष्ट झाली. या भागातील महिला देशातील एकूण महिलांच्या साइनअपपैकी ६५% आहे. वझीर एक्सने काही महिला ट्रेडर्सशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या की, क्रिप्टोने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात तसेच जीवनमान उंचावण्यास मदत झाली. तसेच कुटुंबासाठी दुय्यम उत्पन्नाचा मोठा स्रोतही जोडला गेला.

Previous Post

प्रतीक्षा संपली! ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; फोननेच होते लॉक

Next Post

डांगसौंदाणे- – दिवंगत जवान विजय सोनवणे स्मारक व उद्यानाचे खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन

Next Post
डांगसौंदाणे- – दिवंगत जवान विजय सोनवणे स्मारक व उद्यानाचे खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन

डांगसौंदाणे- - दिवंगत जवान विजय सोनवणे स्मारक व उद्यानाचे खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group