सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजाड उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुसऱ्या व्यापाऱ्यांना कांदा मार्केटमध्ये खरेदी करु देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नवीन व्यापारी शेतकऱ्यांच्या कांद्यास जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतात. आणि अन्य व्यापारी ठरवून भाव देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सर्व शेतकरी एकत्र जमले आणि त्यांनी थेट लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथे तणावाचे वातावरण तयार झाले.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता जो काही कांदा आहे त्यालाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच कांदा व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम संपला. त्यांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. याची तत्काळ दखल घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांसोबत पोलिसांनी चर्चा सुरू केली आहे
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658379300524150785?t=01nLZuKAPTOCbnmFQvRkNA&s=03
Satana Onion Farmer Aggressive Agitation Rasta Roko